Navi Mumbai Municipal Corporation Bharti 2025 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर आणि इयत्ता १२ वीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी चालू आली आहे. कारण नवी मुंबई महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती सुरू आहे. यामध्ये गट-क व गट-ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरली जाणार आहेत. नवी मुंबई महापालिकेने जाहिरातीत नमुद केलेप्रमाणे पदांची शैक्षणिक अर्हता व इतर अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

नवी मुंबई महापालिका भरती प्रक्रिया जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. या जाहिरातीनुसार गट’क’ व गट ‘ड’ मधील एकूण ६२० पदांकरीता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक २८.०३.२०२५ पासून ते दिनांक ११.०५.२०२५ रोजी पर्यंत आहे. इच्छुक उमेदवारांना http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर दिनांक ११.०५.२०२५ या दिवशी रात्री ११.५५ वाजेपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतील.

महापालिका भरती प्रक्रिया परीक्षा शुल्क –

  • खुला प्रवर्ग – १००० रुपये
  • मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्ग – ९००

उपलब्ध पदे आणि पगार तपशील

भरती मोहिमेमध्ये स्पर्धात्मक पगार पॅकेजेससह विविध प्रकारच्या नोकरीच्या पदांचा समावेश आहे. काही प्रमुख भूमिकांमध्ये हे समाविष्ट आहे:

१. बायोमेडिकल इंजिनिअर – पगार ४१,८०० ते १,३२,३०० रुपये दरम्यान

२. ज्युनिअर सिव्हिल इंजिनिअर, ज्युनिअर बायोमेडिकल इंजिनिअर, गार्डन सुपरवायझर, माहिती आणि जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता – पगार ३८,६०० ते १,२८,००० रुपयांदरम्यान

३. दंत स्वच्छता तज्ञ – पगार ३५,४०० ते १,१२,४०० रुपयांदरम्यान

४. स्टाफ नर्स, डायलिसिस टेक्निशियन, स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ईसीजी स्पेशालिस्ट, सीएसएसडी टेक्निशियन, डाएट टेक्निशियन – पगार ५,४०० ते १,१२,४०० रुपयांदरम्यान

५. नेत्ररोग सहाय्यक – पगार ३५,४०० ते १,१२,४०० रुपयांदरम्यान

६. आरोग्य सहाय्यक (महिला), फार्मासिस्ट – पगार २९,२०० ते ९२,३०० रुपयांदरम्यान

गार्डन असिस्टंट, अकाउंट्स क्लर्क, पोस्ट-मॉर्टेम असिस्टंट आणि इतर तत्सम पदांसाठी देखील रिक्त पदे आहेत.

परीक्षेची तारीख, वेळ आणि केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. तसेच संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल अशी माहिती नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर भेट द्या. तसेच पदे, पदांचा तपशील, वेतनश्रेणी, वयोमर्यादा वयोमर्यादा शिथिलता, निवड पद्धत, सर्व साधारण सूचना, अटी व शर्ती, शैक्षणिक अर्हता, सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबाचत तरतूदी, पदनिहाय ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षा शुल्क, अर्ज भरणेबाबत मार्गदर्शक सूचना इत्यादी बाबतचा तपशील http://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.