Navi Mumbai Police Recruitment 2024: नवी मुंबई पोलीस अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त कार्यालय, नवी मुंबई अंतर्गत कायदा अधिकारी या पदाच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन सुरू असून उमेदवारांना २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
पदाचे नाव – कायदा अधिकारी गट-अ आणि कायदा अधिकारी या पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत.
पदसंख्या – एकूण ८ जागा
कायदा अधिकारी या पदासाठी ७ जागा
कायदा अधिकारी गट-अ या पदासाठी १ जागा
शैक्षणिक पात्रता
कायदा अधिकारी गट-अ या पदासाठी उमेदवाराणे मान्यताप्राप्त विदयापिठातुन कायदयाची पदवी घेतलेली असावी.
कायदा अधिकारी – या पदासाठी उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विदयापिठातुन कायदयाची पदवी घेतलेली असावी
कायदा अधिकारी गट अ व कायदा अधिकारी या दोन्ही पदांसाठी वकील व्यवसायाचा किमान २५ वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
उमेदवाराला गुन्हेगारी विषय, सेवाविषयक, प्रशासनिक अशा सर्व प्रकारच्या कायदयाची स्थिती तसेच विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान असणे आवश्यक आहे.
उमेदवाराला मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेस ज्ञान असणे आवश्यक आहे.
वेतन
१. कायदा अधिकारी गट-अ या पदासाठी दरमहा ३५,००० रुपये पगार
२. कायदा अधिकारी या पदासाठी दरमहा २८,००० रुपये पगार
हेही वाचा >> Punjab and Sind Bank Recruitment 2024: पंजाब आणि सिंध बँकेत नोकरीची संधी; रिक्त जागांसाठी भरती सुरू
कसा कराल अर्ज
या पदांसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
इच्छूक उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या अगोदर त्याबाबतच्या सविस्तर सूचना https://www.navimumbaipolice.gov.in/ या संकेतस्थळावर पाहाव्यात.
अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्यावी.
अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे.