NCERT Non-Academic Recruitment 2023: राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद या शासनाच्या संस्थेद्वारे मोठ्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी ठरु शकते. याबाबत एनसीईआरटीद्वारे जाहिरात देखील देण्यात आली आहे. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. २९ एप्रिल २०२३ रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे.

NCERT मध्ये विविध अशैक्षणिक पदांसाठी लवकरच भरती होणार आहे. या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने केलेले अर्ज स्विकारले जातील. ५ मे २०२३ हा ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे अशी माहिती राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदच्या सूचनापत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. संस्थेच्या ncert.nic.in. या अधिकृत वेबसाइटवर जाऊन उमेदवार अर्ज करु शकतात. त्याशिवाय या वेबसाइटवर भरतीसंबंधित सविस्तर माहितीही उपलब्ध आहे. अर्ज केल्यानंतर भरतीचे अपडेट्स मिळवण्यासाठी वेबसाइटची मदत घेता येईल.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Article about obcs dominate government job recruitment
लोकजागर : ओबीसींची ‘सर्वोच्च’ अडवणूक!
ESIC Recruitment 2025
ESIC Recruitment 2025 : परीक्षेशिवाय ESICमध्ये नोकरीची संधी! महिन्याला मिळू शकतो १,३१,०६७ रुपयांपर्यंत पगार, जाणून कोण करू शकते अर्ज?
Mumbai police latest news in marathi
मुंबई पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत गैरप्रकार, आधीच दिली होती सूचना तरीही…
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
scheme for unemployed youth promises rs 8500 per month
सत्तेत आल्यास सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा ८५०० रुपये : काँग्रेस
Dr Kartik Karkera from Mumbai
मुंबईचा डॉ. कार्तिक करकेरा नाशिक मविप्र मॅरेथॉन -२०२५ चा विजेता, पहिले तीनही धावपटू महाराष्ट्रातील

आणखी वाचा – फक्त २५ रुपये अर्ज शुल्क भरून होऊ शकता सरकारी अधिकारी, तेही परिक्षेशिवाय; फक्त ‘ही’ अट करावी लागेल पूर्ण

३४७ पदांसाठी होणार भरती

एनसीईआरटीच्या मेगाभरतीमध्ये ३४७ शिक्षकेतर कर्मचारी/ अशैक्षणिक पदांसाठी योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज केल्यानंतर काही दिवसांनंतर भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात होईल. या पदांसाठी उमेदवारांची निवड खुल्या स्पर्धा परीक्षेद्वारे केली जाईल. संस्थेच्या अधिकाऱ्यांकडून निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती NCERT मुख्यालय, नवी दिल्लीतील NIE व CIET आणि भोपाळमधील PSSCIVE येथे केली जाईल. तसेच अजमेर, भुवनेश्वर, म्हैसूर आणि शिलाँगच्या RIE मध्येही त्यांना नोकरी मिळू शकते. तर काही उमेदवारांना अहमदाबाद, बंगळुरू, गुवाहाटी आणि कोलकाता येथील प्रकाशन विभागात नियुक्त केले जाऊ शकते.

Story img Loader