NCERT Recruitment 2024: नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) ने प्रकाशन विभागातील असिस्टंट एडिटर, प्रूफ रीडर आणि DTP ऑपरेटर या पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती (NCERT भर्ती 2024) साठी अधिसूचना जारी केली आहे. परिषदेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ६० असिस्टंट एडिटरची भरती केली जाणार आहे, त्यापैकी २५इंग्रजी, २५ हिंदी आणि 1१० उर्दू भाषा माध्यमांसाठी आहेत.

त्याचप्रमाणे, NCERT ६० प्रूफ रीडर (NCERT Recruitment 2024) देखील भरती करेल, ज्यापैकी २५ इंग्रजी, २५हिंदी आणि १० उर्दू भाषांसाठी राखीव आहेत. त्याच वेळी, डीटीपी ऑपरेटरच्या एकूण ५० पदांची भरती केली जाणार आहे. यामध्ये इंग्रजीसाठी २०, हिंदीसाठी २०आणि उर्दू भाषेसाठी २० जागा ठेवण्यात आल्या आहेत. या पदांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली जाऊ शकते.

Changes in the recipes of meals served under the Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana Amravati news
अमरावती : ‘गोडखिचडी’, ‘अंडापुलाव’साठी गुरूजींना मागावी लागणार माधुकरी!
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Assistant Police Inspector arrested while taking bribe of Rs. 2 lakhs
सहायक पोलीस निरीक्षकाला दोन लाखांची लाच घेताना अटक; गुन्हा दाखल न करण्यासाठी…
NTPC Recruitment 2025: Monthly Pay Up To Rs 1.4 Lakh, No Written Test Needed
NTPC Recruitment 2025: लेखी परीक्षेशिवाय इंजिनिअरची भरती! पगार १.४० लाख; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
IOCL Apprentice Recruitment 2025:
IOCL Recruitment 2025: इंडियन ऑइलमध्ये ४५६ अप्रेंटिस पदांसाठी होणार भरती, जाणून घ्या भरती प्रक्रिया
Notices issued to 400 employees for absenteeism on Republic Day Legislative Secretariat takes action Mumbai new
प्रजासत्ताकदिनी गैरहजर ४०० कर्मचाऱ्यांना नोटीस, विधिमंडळ सचिवालयाची कारवाई
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
Job Opportunity 234 Vacancies in HPCL career news
नोकरीची संधी: ‘एचपीसीएल’मध्ये २३४ रिक्त पदे

NCERT Recruitment 2024: पदांनुसार पात्रता

असिस्टंट एडिटर,पदांसाठी, उमेदवारांना पुस्तक प्रकाशन किंवा जनसंपर्क किंवा पत्रकारिता या विषयातील पदव्युत्तर डिप्लोमासह पदवी आणि संबंधित कामाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त नसावे.

त्याचप्रमाणे, प्रूफ रीडर पदांसाठी, उमेदवारांना १ वर्षाच्या अनुभवासह इंग्रजी, हिंदी आणि उर्दूमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. या पदांसाठी वयोमर्यादा ४२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. डीटीपी ऑपरेटर पदांसाठी, पदवीसह, डीटीपीमध्ये एक वर्षाचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि संबंधित कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.

हेही वाचा – ISRO recruitment 2024: इस्त्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! शास्त्रज्ञसह ‘या’ पदासाठी होणार भरती, कसा करू शकता अर्ज?

NCERT Recruitment 2024: अधिसूचना लिंक – https://ncert.nic.in/pdf/announcement/vacancies/projectstaffvacancy/PD_AE_PR_DTP-15-01.pdf

हेही वाचा – Talathi Final Result 2023: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर; कुठे पाहू शकता निवड यादी? जाणून घ्या

NCERT Recruitment 2024: अर्ज प्रक्रिया

१ फेब्रुवारी २०२४रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत असिस्टंट एडिटर, प्रूफ रीडर आणि डीटीपी ऑपरेटर (NCERT भर्ती 2024) या पदांसाठी उमेदवार थेट NCERT च्या नवी दिल्लीतील कार्यालयात भेट देऊन नोंदणी करू शकतात. यानंतर, २ आणि ३ फेब्रुवारी २०२४ रोजी आयोजित कौशल्य चाचणीला उपस्थित राहावे लागेल. उमेदवारांना या पत्त्यावर हजर राहावे लागेल – प्रकाशन विभाग, NCERT, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली – ११००१६.

हेही वाचा – RPF अंतर्गत लवकरच २००० पदांची मेगाभरती! १०वी पास उमेदवारांना नोकरीची संधी; पाहा कुठे आणि कसा करायचा अर्ज

NCERT भरती २०२३: पदांनुसार वेतन

  • असिस्टंट एडिटर – ८० हजार रुपये प्रति महिना
  • प्रूफ रीडर – २७ हजार रुपये प्रति महिना
  • डीटीपी ऑपरेटर – दरमहा ५० हजार रुपये

Story img Loader