NCL Recruitment 2023: नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेडने (NCL) ७०० पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अर्ज पाठवले आहेत. एनसीएलच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरु आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२३ आहे. एनसीएल अप्रेंटिस ट्रेनी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवार ऑफिशिअल वेबसाइट http://www.nclcil.in ला जाऊन भेट द्या.
अर्जाच्या आधारावर डॉक्यूमेंट व्हेरीफिकेशनसाठी निवड केलेल्या उमेदवाराची निवड १० ऑगस्ट २०२३ जाहीर होण्याची शक्यता आहे. एनसीएल भरतीमध्ये उमेदवाराचे प्रशिक्षण २१ ऑगस्ट २०२३ पासून सुरू होईल.
एनसीएल भरती २०२३ साठी वयोमर्यादा – एनसीएल भरतीच्यासाठी उमेदवारांचे कमीत कमी वय १८ वर्ष असले पाहिजे आणि वयोमर्यादा २६ वर्ष आहे. उमेदवारसाठी वयोमर्यादा ३० जून २०२३पासून केली जाईल.
अर्ज करण्यासाठी लिंक – https://www.nclcil.in/detail/853989/apprenticeship-training
अधिसुचना – https://www.nclcil.in/Content/nclcil.in/Document/86notification.pdf
हेही वाचा – १० वी पास ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! पूर्व रेल्वे अंतर्गत ‘या’ पदांच्या ६८९ जागांसाठी भरती सुरु
एनसीएल अप्रेंटिस ट्रेनी भरती २०२३मध्ये असा करा अर्ज
- NCL च्या अधिकृत वेबसाइट http://www.nclcil.in ला भेट द्या.
- होम पेजवर दिसणाऱ्या Recruitment आणि नंतर Apprenticeship Training या लिंकवर क्लिक करा.
- आता एक नवीन पेजवर उघडेल ज्यामध्ये भरती अधिसूचनेच्या लिंकवर क्लिक करा आणि अर्जाच्या अटी आणि अर्ज प्रक्रिया योग्यरित्या समजून घेतल्यानंतर अर्ज भरा.
- नोंदणी केल्यानंतरच उमेदवार अर्ज भरू शकतील.
- त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट आउट घ्या.