NDA Recruitment 2024: नॅशनल डिफेन्स अकॅडमी (NDA), पुणे यांनी गट-सी भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. गट-सीच्या विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्या उमेदवारांना NDA मध्ये प्रवेश घ्यायचा आहे ते NDA पुणेच्या अधिकृत वेबसाइट http://www.ndacivrect.gov.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.

NDA भरती अधिसूचनेनुसार, स्टेनोग्राफर, लोअर डिव्हिजन क्लर्क, मल्टी टास्किंग स्टाफ, ड्राफ्ट्समन यासह विविध गट सी पदांसाठी या भरती मोहिमेत एकूण १९८ रिक्त जागा भरल्या जातील. २७ जानेवारी २०२४ रोजी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ती १७ फेब्रुवारी २०२४ पर्यंत सुरू राहणार आहे.

person in jail to contest polls candidates win polls from prison prison contest polls
एक काळ असा होता…
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Bank of baroda recruitment 2024 bank of baroda is conducting the recruitment for 592 Vacancies
BOB Recruitment 2024: बँक ऑफ बडोदामध्ये नोकरीची संधी; ५९२ जागांसाठी अर्ज करा अन् घ्या घसघशीत पगार
BJP Candidate List for Maharashtra Vidhan Sabha Election 2024
BJP Candidate List : भाजपाकडून १४८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर!
dispute in Urans Mahavikas Aghadi in assembly election 2024
उरणमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी
maharashtra vidhan sabha election 2024 Old faces in 18 assembly constituencies in Thane district
ठाणे जिल्ह्याच्या निवडणुक रिंगणात जुनेच चेहरे
In last 20 days 73 611 new voters registered in thane district ahead of assembly elections
जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत वाढ, २० दिवसांत ७३ हजार मतदारांची भर
Job Opportunity Maharashtra State Cooperative Bank Recruitment career news
नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती

हेही वाचा – NCERT मध्ये १७० असिस्टंट एडिटर, प्रूफ रीडर आणि DTP ऑपरेटर्सची होणार भरती; ८० हजारांपर्यंत मिळू शकतो पगार

NDA Recruitment 2024 :रिक्त जागा तपशील येथे पहा

  • निम्न विभाग लिपिक(लोअर डिव्हिजन क्लर्क):१६ पदे
  • स्टेनोग्राफर ग्रेड II: १ पद
  • ड्राफ्ट्समन: २ पदे
  • सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर (OG): ३ पदे
  • कंपोझिटर-कम प्रिंटर: १ पोस्ट
  • सिनेमा प्रोजेक्शनिस्ट GDE-II: १ पोस्ट
  • कूक: १४ पोस्ट
  • सुतार: २ पदे
  • टीए बेकर आणि कन्फेक्शनर: १ पोस्ट
  • फायरमन: २ पदे
  • टीए प्रिंटिंग मशीन OPTR: १ पोस्ट
  • TA- सायकल दुरुस्ती: २ पदे
  • TA- बूट रिपेअरर: १ पोस्ट
  • मल्टी-टास्किंग स्टाफ – ऑफिस आणि ट्रेनिंग (MTS-O&T): १५१ पदे
  • रिक्त पदांची एकूण संख्या: एकूण १९८ पदे

NDA Recruitment 2024 आता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा- https://ndacivrect.gov.in/index.html#/

हेही वाचा – भारतीय सैन्यात भरती होण्याची सुवर्णसंधी! शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे ३८१ पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करावा अर्ज

NDA Recruitment 2024 कोण अर्ज करू शकतो

उमेदवार १०वी, १२वी उतीर्ण असावा आणि काही पदांसाठी मान्यताप्राप्त मंडळाकडून ITI डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

NDA Recruitment 2024 वयोमर्यादा

पात्र अर्जदारांचे वय किमान १८ वर्षे असावे. काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा २७ वर्षे तर काहींसाठी २५ वर्षे आहे.

NDA Recruitment 2024 येथे भरती अधिसूचना पहा – https://ndacivrect.gov.in/pdf/RECTADVT.PDF

NDA Recruitment 2024 निवड प्रक्रिया

पात्र अर्जदारांची निवड परीक्षा, कौशल्य चाचणी/व्यापार चाचणी/शारीरिक चाचणीच्या आधारे केली जाईल. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती अधिसूचनेत तपासली जाऊ शकते. नवीनतम अपटेसाठी अधिकृत वेबसाइटवर लक्ष ठेवा.