Mistakes During A Job Interview : नोकरी शोधणे हे अत्यंत कठीण गोष्ट आहे पण अशक्य नाही. प्रत्येकाला असे वाटते की त्यांना मनाप्रमाणे चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. कधी कधी नोकरीच्या संधी समोर येतात पण आपण त्या संधीचे सोने करू शकत नाही. मुलाखतीदरम्यान अनेकदा आपण अशा काही चुका करतो, की ज्यामुळे आपण आलेली संधी गमावू शकतो. आज आपण मुलाखतीदरम्यान कोणत्या चार चुका कधीही करू नये, याविषयी जाणून घेणार आहोत. (Never do these four mistakes During A Job Interview read what are these things)
सध्या काम करत असलेल्या संस्था किंवा कंपनीविषयी वाईट बोलू नका
जरी तुम्ही तुमची नोकरी वैतागून सोडत असाल तर सध्या काम करत असलेल्या संस्थेविषयी किंवा कंपनीविषयी वाईट बोलू नका. मुलाखतकार किंवा एचआरचे इतर कंपन्याबरोबर चांगले संबंध असू शकतात. त्यामुळे कोणत्याही कंपनीविषयी वाईट बोलू नका आणि आलेली संधी गमावू नका. फक्त तुमच्या कौशल्यावर भर द्या.
तुम्हाला दिलेल्या जबाबदारी आणि पदाविषयी काहीही गृहीत धरू नका
जबाबदारी आणि पद कधीही गृहीत धरू नका नाहीतर नंतर तुम्ही निराश होऊ शकतात. त्यामुळे मुलाखतीदरम्यान तुमच्या कामाविषयी नीट विचारपूस करा. मुलाखत घेणाऱ्याला काय वाटेल याचा विचार करू नका. ऑफरचा विचार करण्यापूर्वी तुमच्या कामाविषयी स्पष्टता असणे, खूप महत्त्वाचे आहे.
स्वत:ची प्रशंसा करू नका
नोकरी मिळवण्यासाठी तुमच्या कौशल्याविषयी सांगणे, खूप जास्त गरजेचे आहे. पण तुम्ही स्वत:ची स्तुती करू नका. कौशल्याविषयी माहिती देणे आणि स्तुती करणे या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. यातील फरक समजून घ्या. या जगात कोणीही परफेक्ट नाही त्यामुळे शिकाऊ वृत्ती दाखवण्याचा प्रयत्न करा.
मुलाखतकारला बोलू द्या
जरी तुम्हाला खूप बोलायची सवय असेल तरी मुलाखतीदरम्यान शांत राहा. तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी आला आहात, याचे भान ठेवा. त्यामुळे सुरुवातीला मुलाखतकाराला बोलू द्या आणि त्यानंतर तुमच्या मनातील प्रश्न विचारा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या.