New India Assurance Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेडअंतर्गत ‘सहायक’ (असिस्टंट) पदासाठी आजपासून भरती सुरू झाली आहे. या पदासाठी एकूण ३०० जागा उपलब्ध आहेत. तसेच अर्जदारांनी १५ फेब्रुवारी या शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. न्यू इंडिया ॲश्युरन्स २०२४ भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, पगार आणि अर्जासंबंधीचे सर्व तपशील जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

New India Assurance Recruitment 2024 : पदाचे नाव- सहायक (असिस्टंट)

New India Assurance Recruitment 2024 : पदसंख्या- ३०० जागा

New India Assurance Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवी किंवा शिक्षण पूर्ण केलेले असावे. तसेच तुम्ही ज्या राज्यासाठी / केंद्रशासित प्रदेशासाठी अर्ज कराल, त्यासंबंधित राजाच्या प्रादेशिक भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

हेही वाचा…Arogya Vibhag Bharti 2024 : आरोग्य विभागामध्ये १,७२९ पदांची मेगा भरती! ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

New India Assurance Recruitment 2024 : वयोमर्यादा- उमेदवारांचे वय २० ते ३० वर्षे असावे.

New India Assurance Recruitment 2024 : अधिकृत वेबसाइट– https://www.newindia.co.in/

New India Assurance Recruitment 2024 : पगार – सहायक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दर महिन्याला ३७,००० रुपये वेतन देण्यात येणार आहे.

तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे. अर्जातील नियम आणि अटी वाचल्यानंतरच ऑनलाइन अर्ज करावा.ऑनलाइनव्यतिरिक्त इतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही, असे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New india assurance bharti 2024 company invited assistants post for 300 vacancies for eligible candidates asp