सुहास पाटील
न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड ( NIACL) (भारत सरकारचा उपक्रम), मुंबई. ३०० असिस्टंट (क्लास III कॅडर) पदांची भरती. ( Ref. No. CORP. HRM/ Asstt/२०२३ २९.०१.२०२४) पदाचे नाव – असिस्टंट (क्लास III कॅडर). एकूण रिक्त पदे – ३०० (अजा – ६८, अज – ४३, इमाव – १०, ईडब्ल्यूएस – ३०, खुला – १४९)
राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील (कंसात स्थानिय भाषा दिलेली आहे.) – महाराष्ट्र (मराठी) – ८१ पदे (अजा – २१, अज – ९, इमाव – ०, ईडब्ल्यूएस – ८, खुला – ४३) (४ पदे दिव्यांगसाठी राखीव) (कॅटेगरी VI/ HI/ OC, ID/ MD साठी प्रत्येकी १ पद); गोवा (कोंकणी) – १ पद (खुला); गुजरात (गुजराती) – २४ पदे. कर्नाटक (कन्नड) – १७ पदे; मध्य प्रदेश (हिंदी) – ९ पदे; राजस्थान – ५ पदे (हिंदी); उत्तर प्रदेश – १४ पदे (हिंदी); उत्तराखंड – ५ पदे (हिंदी) इ.
पात्रता – (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण. (उमेदवार १० वी/ १२ वी/ पदवी स्तरावर इंग्रजी विषयात उत्तीर्ण असावा. तसेच स्थानिय भाषा अवगत असावी. (लिहिता, वाचता, बोलता येणे आवश्यक.))
वयोमर्यादा – (दि. १ जानेवारी २०२४ रोजी) २१ ते ३० वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट इमाव – ३ वर्षे, अजा/ अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे) (पुनर्विवाह न केलेल्या विधवा/ घटस्फोटीत/ कायद्याने विभक्त महिला – ५ वर्षे; NIACL चे कर्मचारी – ५ वर्षे).
हेही वाचा >>> RRB Recruitment 2024: भारतीय रेल्वेत ‘टेक्निशियन’ पदासाठी होणार मेगा भरती; उमेदवार ‘या’ तारखेपासून करू शकतात अर्ज
वेतन – बेसिक पे रु. २२,४०५/, अंदाजे दरमहा वेतन रु. ३७,०००/.
निवड पद्धती – टियर-१ – प्रीलिमिनरी ऑनलाइन एक्झामिनेशन – ऑब्जेक्टिव्ह टाईप १०० गुणांसाठी (इंग्लिश लँग्वेज – ३० गुण, रिझनिंग अॅबिलिटी – ३५ गुण, क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड – ३५ प्रश्न, प्रत्येकी वेळ २० मिनिटे, एकूण वेळ १ तास.)
टियर-२ – मेन एक्झामिनेशन – ऑब्जेक्टिव्ह टेस्ट २५० गुणांसाठी आणि डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट ३० गुणांसाठी.
ऑब्जेक्टिव्ह टेस्ट – २०० गुण, वेळ २ तास ३० मिनिटे. (रिझनिंग – ४० प्रश्न, ५० गुण; इंग्लिश लँग्वेज – ४० प्रश्न, ५० गुण; जनरल अवेअरनेस – ४० प्रश्न, ५० गुण; न्यूमरिकल अॅप्टिट्यूड – ४० प्रश्न, ५० गुण; कॉम्प्युटर नॉलेज – ४० प्रश्न, ५० गुण)
डिस्क्रीप्टिव्ह टेस्टचा कालावधी ३० मिनिटे. गुण – ३०. टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज. (लेटर रायटींग – १० गुण, निबंध लेखन – २० गुण) डिस्क्रीप्टिव्ह टेस्ट फक्त पात्रता स्वरूपाची असेल.
ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपरमध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.
अंतिम निवड – स्थानिय भाषेच्या पेपरमध्ये उत्तीर्ण उमेदवारांची निवड यादी वैद्याकिय तपासणीनंतर ऑनलाइन मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल.
टियर-१ – पूर्व परीक्षा केंद्र – महाराष्ट्रातील अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/नवी मुंबई/ठाणे/ टटफ, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी.
प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंग – अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग उमेदवारांना प्री-एक्झामिनेशन ट्रेनिंगकरिता ऑनलाइन अर्ज करताना तशी नोंद करावी लागेल.
प्रोबेशन कालावधी ६ महिन्यांचा असेल जो आणखीन वाढविला जावू शकतो.
अर्जाचे शुल्क – अजा/ अज/ दिव्यांग रु. १००/- इतर उमेदवारांना रु. ८५०/-.
ऑनलाइन अॅप्लिकेशन रजिस्ट्रेशन http://newindia.co.io या संकेतस्थळावर दि. १५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करावे. टियर-१ परीक्षा दि. २ मार्च २०२४ रोजी घेतली जाईल.