NFL Recruitment 2023 : कृषी विषयाशी संबंधित शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. ती म्हणजे नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (NFL) अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३ –
एकूण रिक्त पदे – ७४
पदाचे नाव व रिक्त पदे:
पदाचे नाव – मॅनेजमेंट ट्रेनी
शाखा – मार्केटिंग, F&A, लॉ
शैक्षणिक पात्रता –
मार्केटिंग : ६० टक्के गुणांसह मार्केटिंग/ ऍग्री बिजनेस मार्केटिंग/ रूरल मॅनेजमेंट/ फॉरेन ट्रेड इंटरनेशनल मार्केटिंग विषयात MBA/ PGDBM/ PGDM किंवा ६० टक्के गुणांसह कृषी विषयात B.Sc + M.Sc.
F&A : CA/ ICWA/ CMA.
लॉ : ६० टक्के गुणांसह LLB.
हेही वाचा- १० वी पास आणि पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी! आयकर विभागात ‘या’ पदांसाठी भरती सुरु
वयोमर्यादा –
- खुला प्रवर्ग – १८ ते २७ वर्षे.
- ओबीसी – ३ वर्षे सूट.
- मागासवर्गीय – ५ वर्षे सूट.
अर्ज फी –
खुला/ ओबीसी/ EWS – ७०० रुपये.
मागासवर्गीय/ माझी सैनिक यांना फी नाही.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – २ नोव्हेंबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १ डिसेंबर २०२३
अधिकृत बेवसाईट – https://www.nationalfertilizers.com/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक – https://careers.nfl.co.in/advinfo.php?advertisement=eccbc87e4b5ce2fe28308fd9f2a7baf3
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी (https://drive.google.com/file/d/1-DVyvzBh0js1Z76EUoL6XZmEMPvDnxOi/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.