NHIDCL Recruitment 2024 Notification: सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आली आहे. तुम्ही जर सरकारी नोकरी शोधत असाल आणि तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही ही मोठी संधी तुमच्यासाठी नक्कीच आहे.विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. आता अर्ज करण्याची तारीखही जवळ आलीये.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नॅशनल हायवे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी सरकारी नोकरी शोधत असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. यासाठी NHIDCL ने व्यवस्थापक पदासाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट nhidcl.com द्वारे अर्ज करू शकतात. . या भरतीद्वारे व्यवस्थापकाची १३६ पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी, येथे दिलेल्या महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा. NHIDCL भर्ती २०२४ साठी अर्ज प्रक्रिया २७ जानेवारीपासून सुरू झाली आहे.

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३६ पदे भरायची आहेत. या पदांसाठी उमेदवार २६ फेब्रुवारी रोजीपर्यंत अर्ज करू शकतात. तुम्हीही या पदांसाठी अर्ज करण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी दिलेल्या या महत्त्वाच्या गोष्टी काळजीपूर्वक वाचा.

सदर संस्थेमधील रिक्त जागांचा तपशील खालीलप्रमाणे :

या भरतीद्वारे व्यवस्थापकाच्या एकूण १३६ पदांवर भरती केली जाणार आहे. पोस्टनिहाय रिक्त जागा खाली पाहिल्या जाऊ शकतात.

  • महाव्यवस्थापक- ६ पदे
  • उपमहाव्यवस्थापक- २२ पदे
  • व्यवस्थापक – ४० पदे
  • उपव्यवस्थापक- २४ पदे
  • असिस्टंट मॅनेजर – १७ पदे
  • कनिष्ठ व्यवस्थापक – १९ पदे
  • प्रधान खाजगी सचिव – १ पद
  • खाजगी सहाय्यक- ७ पदे
  • एकूण पदांची संख्या- १३६

NHIDCL मध्ये फॉर्म भरण्यासाठी पात्रता

ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्याकडे अधिकृत अधिसूचनेत दिलेली संबंधित पात्रता असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना तपासणे आवश्यक आहे.

हेही वाचा >> NMDC Jobs: इंजिनीअर्सना नोकरीची सुवर्णसंधी! अधिक माहितीसाठी सविस्तर बातमी वाचा

फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा

जे उमेदवार या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करत आहेत, त्यांचे कमाल वय अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार ५६ वर्षे असावे. NHIDCL भर्ती 2024 अंतर्गत व्यवस्थापकासाठी निवडलेल्या उमेदवारांना पदानुसार वेगवेगळे वेतन दिले जाणार आहे.

अधिकृत सुचना – 

Click to access Full-advertisement-English-Jan-24.pdf

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nhidcl recruitment 2024 notification for 136 manager vacancies apply online srk