NHSRCL Recruitment 2023: शासनाच्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये लवकरच मेगा भरती केली जाणार आहे. या भरतीसंबंधित सूचनापत्र काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहे. NHSRCL द्वारे केल्या जाणाऱ्या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागतील. २ मे रोजी ऑनलाइन अर्ज करायच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या सरकारी कंपनीच्या nhsrcl.in अधिकृत वेबसाइटवर भरतीशी निगडीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ५२ जागांसाठी नवीन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या जागांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया नुकतीच सुरु झाली असून ३१ मे हा ऑनलाइन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर अर्ज केल्यास तो स्विकारला जाणार नाही. NHSRCLमध्ये पुढील जागांसाठी भरतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सेक्शन ए :
टेक्निशियन (एस अन्ड टी) – ८ जागा
ज्यूनिअर इंजिनिअर (एस अन्ड टी) – ८ जागा
सेक्शन बी :
असिस्टंट मॅनेजर सिव्हिल – ११ जागा
असिस्टंट मॅनेजर प्लॅनिंग – २ जागा
असिस्टंट मॅनेजर एआर – २ जागा
ज्यूनिअर मॅनेजर इलेक्ट्रिकल – २१ जागा
शैक्षणिक पात्रता:
टेक्निशियन
इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ कंप्यूटर ऑपरेटर यांमध्ये आयटीआय किंवा इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अन्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ कंप्यूटर/ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी इंजिनिअरिंग यांमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक. त्यासह कमीत कमी चार वर्षांचा काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
ज्यूनिअर इंजिनिअर
बीई/ डिप्लोमा/ बीटेक इलेक्ट्रॉनिक्स अन्ड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स/ कंप्यूटर/ आयटी इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक. त्यासह कमीत कमी चार वर्षांचा काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
असिस्टंट मॅनेजर
संबंधित विषयामध्ये डिप्लोमा/बीई/बीटेक पदवी असणे आवश्यक. त्यासह कमीत कमी चार वर्षांचा काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
आणखी वाचा – NPCIL recruitment 2023: डेप्युटी मॅनेजरसह इतर पदांसाठी होणार भरती, १२ मे पासून करा अर्ज
ज्यूनिअर मॅनेजर
संबंधित विषयामध्ये डिप्लोमा/बीई/बीटेक पदवी असणे आवश्यक. त्यासह कमीत कमी दोन वर्षांचा काम करण्याचा अनुभव असणे गरजेचे आहे.
(NHSRCL च्या भरती संदर्भातील अपडेट्स या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन मिळवू शकता.)