NIA Bharti 2023: राष्ट्रीय तपास संस्थेत विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी पदांच्या एकूण १३ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून उमेदवारांना आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहेत.भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि पगार याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
राष्ट्रीय तपास संस्था भरती – २०२३
पदाचे नाव – उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी
पद संख्या- १३
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज सादर करण्याचा पत्ता – SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ आणि २१ ऑक्टोबर २०२३ (पदांनुसार )
अधिकृत वेबसाईट – http://www.nia.gov.in
पदाचे नाव पद संख्या –
- उप विधी अधिकारी – ४ पदे
- वरिष्ठ सरकारी वकील – ३ पदे
- सरकारी वकील- ५ पदे
- प्रधान माहिती अधिकारी – १ पद
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील – कायदा विषयातील पदवी.
प्रधान माहिती अधिकारी – बॅचलर पदवी.
पगार –
उप विधी अधिकारी – ५६ हजार १०० रुपये ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये.
वरिष्ठ सरकारी वकील – ६७ हजार ७०० रुपये ते २ लाख ८ हजार ७०० रुपये.
सरकारी वकील – ७८ हजार ८०० रुपये ते २ लाख ९ हजार २०० रुपये.
प्रधान माहिती अधिकारी – १ लाख २३ हजार १०० रुपये ते २ लाख १५ हजार ९०० रुपये.