NIACL Recruitment 2023: न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी लिमिटेडने (NIACL) नोकरीची भरती केली आहे. NIACLने प्रशासकीय अधिकारी ((जनरलिस्ट और स्पेशलिस्ट)) (स्केल I) ची पदे भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल आणि तुम्ही पात्र असाल तर अर्ज करा. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट http://www.newindia.co.in वर जाऊन अर्ज करू शकतील. भरतीची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

शेवटची तारीख आणि रिक्त जागा तपशील
जाहीर केलेल्या सूचनेनुसार, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया १ ऑगस्ट २०२३ पासून सुरू केली जाईल. यासाठी भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२३ आहे. या भरती मोहिमेद्वारे एकूण ४५० रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. संबंधित विषयांबाबत अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

Multi-candidate contests on most seats in Nashik 196 candidates in 15 constituencies
नाशिकमध्ये बहुसंख्य जागांवर बहुरंगी लढती; १५ मतदारसंघात १९६ उमेदवार
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
candidates Bhayander, Rebellion BJP,
भाईंदरमध्ये १७ उमेदवार रिंगणात, ६ जणांची माघार, भाजपमधील बंडखोरी शमली, गीता जैन यांना ‘फलंदाज’ चिन्ह
nagpur in seven constituencies After 77 candidates withdrew 102 candidates remain
यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…
Maharashtra ssc 10th board exam
दहावीच्या परीक्षा अर्जांसाठी मुदतवाढ… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
apprenticeship at konkan railway
कोकण रेल्वेत अप्रेंटिसशिप
MHADA Mumbai Lottery 2024 Last eight days for winners to submit acceptance letter Mumbai news
म्हाडा मुंबई सोडत २०२४: स्वीकृती पत्र सादर करण्यासाठी विजेत्यांना अखेरची आठ दिवसांची मुदत

इंडियन पोस्ट पेमेंट बँकेमध्ये एक्झिक्युटिव्हच्या १३२ पदांसाठी निघाली भरती, जाणून घ्या कशी होईल निवड, अर्जाची प्रक्रिया

वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची वयोमर्यादा २१ वर्षे ते ३० वर्षे असावी. या व्यतिरिक्त, या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या SC/ST/PWBD उमेदवारांसाठी १०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, SC/ST/PWBD व्यतिरिक्त इतर सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. ८५० आहे.

अधिसुचना – https://www.newindia.co.in/cms/3bebcbfa-feaa-4e19-ace7-2de62d1de0af/DETAILEDADVERTISEMENT-NIACLAODRRE2023(1).pdf?guest=true

NCLमध्ये ७०० अप्रेंटीस ट्रेनी पदासाठी भरती सुरु, अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घ्या

याप्रमाणे अर्ज करा
सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम http://www.newindia.co.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
त्यानंतर होमपेजवरील रिक्रूटमेंट सेक्शनवर क्लिक करा.
त्यानंतर अर्ज ऑनलाइन वर क्लिक करा.
मग नोंदणी करा आणि अर्जासह पुढे जा.
आता तुमचा अर्ज भरा.
यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
शेवटी फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.