NIELIT Recruitment 2023: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीने भरतीसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. या भरती मोहिमेंतर्गत संस्थमध्ये शास्त्रज्ञ, डेप्युटी मॅनजरसह इतर पदांवर भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची सुरूवात झाली आहे. उमेदवार या भरतीसाठी १३ ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकतात त्यासाठी nielit.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.
या भरतीसाठी एकूण ५६ पदांची भरती केली जाणार आहे. त्यामध्ये शास्त्रज्ञ, डेप्युटी मॅनज, प्रायव्हेट सेक्रेटरी, पीए इत्यादी पदांचा समावेश आहे.
हेही वाचा – Vizag स्टील प्लँटमध्ये ‘या’ २५० पदांसाठी होणार भरती; इतका मिळेल पगार? जाणून घ्या निवड प्रक्रिया
NIELIT Recruitment 2023: अर्ज शुल्क
या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांला अर्ज शुल्क भरावे लागले. या भरती प्रक्रियेंतर्गत सामान्य वर्गातील लेव्हल १० किंवा त्यापेक्ष वरील पदासाठी उमेदवाराला ८०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला/माजी सैनिक यांना या पदासाठी अर्ज करण्यासाठी ४०० रुपये भरावे लागेल. सामान्य वर्गातील लेव्हल ७ आणि त्यापेक्षा कमी असलेल्या पदासाठी ६००रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला/माजी सैनिक यांना या पदासाठी ३०० रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
अधिसुचना – https://register-delhi.nielit.gov.in/nielit23/PDF/NIELIT/Detailed%20Advertisement-22.06.2023(F)-Version%201.pdf
अर्ज करण्यासाठी थेट लिंक – https://register-delhi.nielit.gov.in/
NIELIT भरती २०२३: अर्ज कसा करावा
सर्व उमेदवारांनी सर्वप्रथम nielit.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या
त्यानंतर उमेदवाराच्या होमपेजवरील रिक्रूटमेंट टॅबवर क्लिक करा
नंतर उमेदवार संबंधित भरती लिंकवर क्लिक करा
आता उमेदवार स्वतःची नोंदणी करावी आणि अर्ज भरावा
त्यानंतर अर्ज शुल्क भरावे
त्यानंतर उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे
आता उमेदवाराने त्यांचा अर्ज सबमिट करावा
त्यानंतर भविष्यातील संदर्भासाठी फॉर्मची प्रिंट आउट घ्या.
सूचना तपासण्यासाठी येथे क्लिक करा