NIOH recruitment 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थमध्ये अप्पर आणि लोअर विभागाच्या लिपिक पदासाठी नोकरीची भरती होणार आहे. या पदावर नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख काय आहे जाणून घ्या. तसेच, पात्रता निकष आणि शैक्षणिक पात्रता पाहा.

NIOH recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

वरिष्ठ विभाग लिपिक [upper division clerk] या पदासाठी एकूण १ जागा उपलब्ध आहे.
कनिष्ठ विभाग लिपिक [Lower Division Clerk] या पदासाठी एकूण ४ जागा उपलब्ध आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

NIOH recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

वरिष्ठ विभाग लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ विभाग लिपिक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : ICAR-NBSSLUP recruitment 2024 : नागपूर शहरात नोकरीची सुवर्णसंधी! मिळणार ‘इतक्या’ हजारांचे वेतन

हेही वाचा : ICAR-NBSSLUP recruitment 2024 : नागपूर शहरात नोकरीची सुवर्णसंधी! मिळणार ‘इतक्या’ हजारांचे वेतन

NIOH recruitment 2024 : वेतन

वरिष्ठ विभाग लिपिक या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास साधारण २५,५००/- ते ८१,१००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.
कनिष्ठ विभाग लिपिक या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास साधारण १९,९००/- ते??? ६३,२००/- रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.

NIOH recruitment 2024 – नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनल हेल्थ अधिकृत वेबसाईट –
https://www.nioh.org/

NIOH recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.nioh.org/assests/pdf/jobs/2024/NIOH_Vacancy_Notification_LDC_UDC_2024_en.pdf

NIOH recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज भरती

वरील कोणत्याही पदासाठी इच्छुक उमेदवारास नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास तो ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
या पदासाठी नोकरीचा अर्ज पाठविणाऱ्या उमेदवाराचे वय हे १८ ते २७ वर्षांमधील असावे.
नोकरीचा अर्ज करताना उमेदवाराने आपली संपूर्ण आणि अचूक माहिती भरावी.
तसेच आवश्यक असल्यास आपली कागदपत्रे अर्जासह जोडावी.
नोकरीचा अर्ज हा इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेआधी पाठवणे आवश्यक आहे.
नोकरीचा अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही १८ एप्रिल २०२४ अशी आहे.

वरिष्ठ विभाग लिपिक आणि कनिष्ठ विभाग लिपिक पदाच्या नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑक्युपेशनलच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी, अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.

Story img Loader