National Institute of Virology Pune Recruitment 2024: तुम्ही बारावी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल तर पुण्यामध्ये तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ‘एनआयव्ही’ इंस्टिट्यूट म्हणजेच ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, पुणे’ यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे.या भरतीमध्ये ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छूक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०२४ आहे.

नुकतीच याबाबत ‘एनआयव्ही’ कडून अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी पुण्यात काम करायची सुवर्ण संधी आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन याबाबतची सविस्तर माहिती पाहूयात.

नोकरी ठिकाण: पुणे</p>

वयोमर्यादा: १८ ते २८ वर्षे

‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी, पुणे भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या

पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

पदसंख्या : एकूण ३१ जागा भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

१. इलेक्ट्रिशियन – या विभागात ८ जागांची भरती करण्यात येणार आहे.

२. प्लम्बर – विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.

३. मेकॅनिक (रेफ्रिजरेटर आणि एअर कंडिशन) – या विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.

४. प्रोग्रामिंग आणि सिस्टिम्स ऍडमिनिस्ट्रेशन असिस्टंट या विभागात १३ जागांची भरती करण्यात येणार आहे.

५. कार्पेंटर – या विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.

६. मेकॅनिक (मोटर) – या विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.

७. इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजि सिस्टीम मॅनेजमेंट – या विभागात २ जागांची भरती करण्यात येणार आहे.

हेही वाचा >> NFL Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन; ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’मध्ये ३४९ जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता: ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी उमेदवाराचे आयटीआय शिक्षण पूर्ण झालेले असावे.

वेतन: ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी सुरुवातीला ८,६८५ ते ९,७७० रुपये पगार देण्यात येईल.