एनएलसी इंडिया लिमिटेड ही कंपनी केंद्र शासनाची नवरत्न कंपनी आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही येथे अर्ज करू शकता. एनएलसी इंडिया लिमिटेडने डिप्लोमा आणि इंजिनीअरिंग यांच्या ॲप्रेंटिस पदांच्या रिक्त जागांवर भरती काढली आहे. ॲप्रेंटिसशिपचा कालावधी एक वर्षाचा असेल. NLC India Limited मध्ये भरतीसाठी १८ जानेवारीपासून ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच अर्जाची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे. एनसीएल ॲप्रेंटिस ट्रेनी भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.nlcindia.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

२०१९/ २०२० /२०२१ / २०२२ आणि २०२३ मध्ये उत्तीर्ण झालेले आणि खाली नमूद केलेल्या अभ्यासक्रमांमध्ये पदवीधर, डिप्लोमा असलेले उमदेवार अर्ज करू शकणार आहेत. एनएलसी इंडिया लिमिटेड कंपनीकडून ६३२ पदांसाठी ही भरती होत आहे. त्यापैकी ३१४ पदवीधर आणि ३१८ डिप्लोमा शिकाऊ उमेदवारांच्या पदासाठी आहेत.

हेही वाचा…भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये पदवीधरांसाठी नोकरीची संधी! लगेच करा अर्ज, जाणून घ्या पात्रता आणि निकष

NLC India Limited 2024: पात्रता आणि निकष:

पदवीधर शिकाऊंसाठी पुढील दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत.
इंजिनीअरिंग किंवा डिप्लोमा विषयात संबंधित विद्यापीठाने दिलेली पदवी.
एखाद्या संस्थेद्वारे प्रदान करण्यात आलेली इंजिनीअरिंग किंवा डिप्लोमाची पदवी.

पदवीधर ॲप्रेंटिस :

१. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्थांची पदवी परीक्षा. .
२. संबंधित विषयात बी. टेक/ बॅचलर ऑफ फार्मसी (बी.फार्म).

टेक्निशियन (डिप्लोमा) शिकाऊ उमेदवार:

१. राज्य परिषद किंवा राज्य सरकारने संबंधित विषयात तंत्रशिक्षण मंडळासाठी दिलेला इंजिनीअरिंग डिप्लोमा.
२. संबंधित विषयात विद्यापीठाने दिलेला इंजिनीअरिंग किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा.
३. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेद्वारे इंजिनीअरिंग किंवा डिप्लोमा.

NLC India Limited 2024: निवड प्रक्रिया

डिप्लोमा किंवा पदवीमध्ये मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. तसेच १९ फेब्रुवारी २०२४ रोजी निवडलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी लगेचच या प्रक्रियेसाठी अर्ज करा.