NLC India Limited Recruitment 2024 : NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत २९ एप्रिल २०२४ पासून ऑपरेशन्स आणि मेन्टेनन्सच्या एक्झिक्युटिव्ह पदांवर मोठ्या प्रमाणावर भरती करण्यात येणार आहे. मात्र, या पदांवर नेमक्या किती जागा रिक्त आहेत, या नोकरीसाठी कोण अर्ज करू शकतात, याची इच्छुक उमेदवारांनी माहिती जाणून घ्या. तसेच नोकरीचा अर्ज करण्याची अंतिम तारीख पाहा.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

NLC India Limited Recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एकूण २४ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

मेन्टेनन्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी एकूण १२ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

एक्झिक्युटिव्ह पदासाठी अशा एकूण ३६ जागांवर NLC इंडिया लिमिटेड नोकरीसाठी उमेदवारांच्या शोधात आहे.

NLC India Limited Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी नोकरीचा अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे, केमिकल/C&I/E&I/ECE/इलेक्ट्रिकल/EEE/मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

मेन्टेनन्स एक्झिक्युटिव्ह या पदासाठी नोकरीचा अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सिव्हिल/केमिकल/C&I/E&I/ECE/इलेक्ट्रिकल/EEE/मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Mumbai University recruitment 2024 : मुंबई विद्यापीठात भरती! ‘या’ पदांसाठी लगेच करा अर्ज….

NLC India Limited Recruitment 2024 : वेतन

ऑपरेशन्स एक्झिक्युटिव्ह या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास त्यांच्या श्रेणीनुसार, दरमहा ७० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.

मेन्टेनन्स एक्झिक्युटिव्ह या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्या उमेदवारास त्यांच्या श्रेणीनुसार, दरमहा ७० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल.

NLC India Limited Recruitment 2024 – NLC इंडिया लिमिटेड अधिकृत वेबसाईट लिंक –
https://www.nlcindia.in/new_website/index.htm

NLC India Limited Recruitment 2024 – अधिसूचना –
https://www.nlcindia.in/new_website/careers/03-2024.pdf

NLC India Limited Recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारांना नोकरीचा अर्ज पाठवायचा असल्यास त्यांनी तो ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे.
अर्ज भरताना उमेदवारांनी आपली अचूक आणि संपूर्ण माहिती भरणे अनिवार्य आहे.
तसेच अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी.
नोकरीचा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोकरीसंबंधी माहिती काळजीपूर्वक वाचावी.
नोकरीचे हे अर्ज २९ एप्रिल २०२४ पासून ते २० मे २०२४ पर्यंत स्वीकारले जातील.

वर नमूद केलेल्या नोकरीसंबंधी उमेदवारास अधिक माहिती हवी असल्यास, त्यांनी NLC इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाइट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nlc india limited recruitment for 2024 how to apply online for the new hiring check out the details dha