NLC Recruitment 2023 Notification: एनआयसी इंडिया लिमिटेडने रिक्त जागांवर भरती काढली आहे. जर तुम्ही सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही येथे अर्ज करू शकता. NLC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट nlcindia.in वर या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. येथे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर, मॅनेजरसह विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

एनएलसी भरती २०२३ साठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवार ५ जुलैपासून अर्ज पाठवू शकता. या भरती मोहिमेंतर्गंत विविध पदांची भरती होणार आहे. भरतीसंबधित पात्रता, मानदंड, निवड प्रक्रियासह एनएलसी इंडिया लिमिटेड भरती २०२३शी संबंधित सविस्तर माहिती येथे दिली आहे.

Adar Poonawalla Net Worth Car Collection House Property in Marathi
Adar Poonawalla Net Worth : करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये अदर पूनावालांची हजार कोटींची गुंतवणूक, एकूण किती संपत्तीचे आहेत मालक?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Toyota launched the Limited Edition Urban Cruiser Taisor
Toyota Taisor Offers Accessories : वेलकम डोअर लॅम्पसह मोफत मिळणार २० हजार रुपयांच्या ॲक्सेसरीज, पाहा लिमिटेड एडिशनची किंमत
CCTV, Thane district, Thane, Thane latest news,
उरणकरांच्या सुरक्षेसाठी ३४ ठिकाणी सीसीटीव्ही
Shortage of petrol diesel in Pune Pimpri Chinchwad due to protest of pump owner Pune news
पुणे, पिंपरी-चिंचवडवर इंधन टंचाईचे सावट! पंपचालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल, डिझेलचा तुटवडा
issues of police Deprived of medical facilities after retirement
पोलीस व्यथा-भाग ३ : सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय सुविधांपासून वंचित
Coldplay Bookmyshow
Coldplay Ticket : तिकिटांच्या काळाबाजार प्रकरणी बुक माय शोच्या सीईओंना दोनवेळा नोटीस; पण हजर झाले दुसरेच अधिकारी!
Portfolio IRR investment Stock market index
माझा पोर्टफोलियो : भाव वधारले, सतर्कता आवश्यक!

एनएलसी भरती २०२३ : रिक्त जागा तपशील

जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर आणि एक्झिक्युटिव्ह इंजीनिअर अशा एकूण २९४ पदांची भरती केली जाणार आहे.

हेही वाचा- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १००० रिक्त जागांसाठी होणार भरती! १५ जुलैपर्यंत करू शकता अर्ज

एनएलसी भरती २०२३ :महत्त्वाच्या तारखा

NLC भरती २०२३ साठी ऑनलाइन नोंदणी ५ जुलै २०२३ पासून सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
या भरतीसाठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख ३ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख ३ ऑगस्ट २०२३ (रात्री ११.४५) आहे.
ज्या उमेदवारांनी नोंदणी आणि शुल्क आधीच भरले आहे ते ४ ऑगस्ट २०२३ ( सायंकाळी ५) पर्यंत अर्ज करू शकतात.

एनएलसी भरती २०२३ : शैक्षणिक पात्रता

या रिक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बीटेक, बीई, एमएससी, एमटेक, सीए, पीजी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा महाविद्यालयातून डिप्लोमा असणे आवश्यक आहे. एमबीएसह इतर काही शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवारही या पदांसाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचा – १० वी पास ते पदवीधरांना नोकरीची मोठी संधी! पॉवरग्रिड कॉर्पोरेशनमध्ये १०३५ पदांसाठी भरती सुरु, आजच अर्ज करा

एनएलसी भरती २०२३ : वयोमर्यादा

NLC भरती 2023 साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा ३० ते ५४ वर्षे दरम्यान असावी.

एनएलसी भरती २०२३ : इतका पगार मिळेल

या भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना ५०,००० रुपये ते २,८०,००० रुपये मासिक पगार (ग्रेड) दिले जाईल.

अधिकृत अधिसुचना – https://www.nlcindia.in/new_website/careers/advt_04-2023.pdf

एनएलसी भरती २०२३ : अर्ज शुल्क

सामान्य, EWS, OBC (NCL) वर्गातील उमेदवार – रु ८५४ रुपये
SC, ST, PWBD श्रेणी आणि माजी सैनिक – ३५४ रुपये