Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2024: नागपूर महापालिकेद्वारे क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक या पदांसाठी भरती मोहिम आयोजित केली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ४४ पदे रिक्त आहेत. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण नागपूर आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ३० सप्टेंबर २०२४ रोजी क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक या पदासाठी मुलाखतीसाठी हजर राहावे आणि इतर पदांसाठी २६ आणि २७ सप्टेंबर २०२४ रोजी मुलाखत होईल.
NMC Recruitment 2024 :वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करण्यास इच्छूक उमेदवाराचे वय ४५ ते ६५ वर्ष दरम्यान असावे.
NMC Nagpur Teacher Vacancy 2024 : पदाचा तपशील
- क्रीडा शिक्षक १३
- संगीत शिक्षक १३
- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक १८
NMC Recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता(Educational Qualification)
- क्रीडा शिक्षक – बी.पी.एज(बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन) आणि एम.पी.एड (मास्टर्स ऑफिसफिजिकल एज्युकेशन)
- संगीत शिक्षक- बी . ए. (बॅचरलर ऑफ आर्ट्स) , एम.ए.(मास्टर्स ऑफ आर्ट्स)
- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक – बॅचलर ऑफ सायन्स (बीएससी) आणि मास्टर ऑफ सायन्स (एमएससी), बी . ए. (बॅचरल ऑफ एज्युकेशन), एम.ए.(मास्टर्स ऑफ एज्युकेशन)
NMC Recruitment 2024 : मुलाखतीचा पत्ता – शिक्षक विभाग, नागपूर महानगरपालिका, सिव्हील लाईन्स, म.न.पा. नागपूर
NMC Recruitment 2024 : अधिकृत वेबसाईट – http://www.nmcnagpur.gov.in
NMC Recruitment 2024 : अधिकृत अधिसुचना
- क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक – https://nmcnagpur.gov.in/assets/300/2024/09/mediafiles/3.pdf
- माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक – https://nmcnagpur.gov.in/assets/300/2024/09/mediafiles/1.pdf
Nagpur Mahanagarpalika Notification २०२४ : निवड प्रक्रिया (Selection Process)
वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे. क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक या पदांसाठी मुलाखतीची तारीख ३० सप्टेंबर २०२४ तसेच इतर पदांसाठी २६ व २७ सप्टेंबर २०२४ आहे.