NMDC Recruitment 2024: नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर विविध शिकाऊ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ट्रेड अप्रेंटिसच्या पदांच्या १२० रिक्त जागांवर भरती करण्यात येत आहे. या १२० रिक्त जागा कंत्राटी पद्धतीवर भरती करण्यात येत आहे. विविध शाखांमधील इंजिनिअर्ससाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. देशातील विविध ठिकाणी काम करण्याची यामध्ये संधी मिळणार आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकर ऑनलाईन अर्ज करावा. या भरतीसाठी अधिसूचना, पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि इतर तपशील जाणून घ्या.
नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन भरती २०२४ –
एकूण रिक्त पदे – १२०
पदाचे नाव –
मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक (मोटर वाहन) यासह विविध ट्रेडमध्ये भरती केली जाईल.
शैक्षणिक पात्रता –
उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंगद्वारे आयटीआय उत्तीर्ण केलेली असावी. तुम्हाला पदांच्या शैक्षणिक पात्रतेच्या तपशीलासाठी अधिसूचना पाहा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर तपशील माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासावी.
महत्वाच्या तारखा –
- NMDC ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज/वॉक-इन-इंटरव्ह्यू शेड्यूलसह तपशीलवार सूचना अपलोड केली आहे.
- २२ ते २६ फेब्रुवारी २०२४ दरम्यान आयोजित केलेल्या पोस्टनिहाय वॉक-इन-मुलाखतीनुसार तुम्ही या पदांसाठी मुलाखत घेऊ शकता.
हेही वाचा >> NIACL Bharti 2024 : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! कंपनीमध्ये ‘या’ पदासाठी आहेत ३०० जागा; जाणून घ्या सविस्तर माहिती
NMDC Recruitment 2024 : अर्ज कुठे दाखल कराल?
या भरतीसाठी थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल.
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी अधिकृत सुचना –