NMMC Bharti 2023: नवी मुंबई महानगरपालिकेने काही पदांसाठीची भरती जाहीर केली आहे. या भरतीअंतर्गत वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मुलाखतीची तारीख याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई महानगरपालिका भरती २०२३ –

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, एपिडेमिओलॉजिस्ट

एकूण पद संख्या – ८

शैक्षणिक पात्रता –

वैद्यकीय अधिकारी – मान्यता प्राप्त विदयापीठाची एम.बी.बी.एस. पदवी.
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलची नोंदणी बंधनकारक. शासकीय / स्थानिक संस्था/ट्रस्ट/खाजगी यांचा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक

मायक्रोबायोलॉजिस्ट – MD मायक्रोबायोलॉजिस्ट

एपिडेमिओलॉजिस्ट- MPH/MHA/MBA असलेले कोणतेही वैद्यकीय पदवीधर

शैक्षणिक पात्रता संबंधित अधिकची माहिती पाहण्यासाठी मूळ जाहिरात अवश्य वाचा.

नोकरी ठिकाण – नवी मुंबई.

वयोमर्यादा – ७० वर्षांपर्यंत.

निवड प्रक्रिया – मुलाखत.

मुलाखतीचा पत्ता – आरोग्य विभाग, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, प्लॉट क्रमांक १/२, पामबीच रोड, से. १५ ए, सीबीडी बेलापूर

मुलाखतीची तारीख – १२ जुलै २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.nmmc.gov.in

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

पगार –

  • वैद्यकीय अधिकारी- ६० हजार प्रति महिना
  • मायक्रोबायोलॉजिस्ट – ७५ हजार प्रति महिना
  • एपिडेमिओलॉजिस्ट – ३५ हजार प्रति महिना

भरती संदर्भातील अधिकच्या माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1Rg-e0uB8EXo4V17U7G6BHOpntk7U59IA/view) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nmmc bharti 2023 recruitment through direct interview for various vacancies under navi mumbai municipal corporation jap
Show comments