नॉर्दन कोलफील्ड्स लिमिटेड यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. विविध विभागांतील ‘असिस्टंट फोरमन’साठी या पदाच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार NCL च्या अधिकृत वेबसाइट nclcil.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात. या अर्जाची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२४ अशी असणार आहे. तर या भरतीसाठी पदे, पात्रता वेतन आणि अर्ज प्रक्रिया यांचा सविस्तर तपशील जाणून घेऊ.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Northern Coalfields Limited Recruitment 2024: पदे आणि पदसंख्या

असिस्टंट फोरमन (E&T) (ट्रेनी) ग्रेड – सी : ९ पोस्ट

असिस्टंट फोरमन (मेडिकल) (ट्रेनी) ग्रेड – सी : ६१ पोस्ट

असिस्टंट फोरमन (इलेक्ट्रिकल) (ट्रेनी) ग्रेड – सी : ८२ पोस्ट

Northern Coalfields Limited Recruitment 2024: वयोमर्यादा
किमान १८ ते ३० वर्षे

हेही वाचा…भारतीय सैन्यदलात भरती होण्याची सुवर्णसंधी! शॉर्ट सर्व्हिस कमिशनद्वारे ३८१ पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करावा अर्ज

Northern Coalfields Limited Recruitment 2024: निवड प्रक्रिया

ऑनलाइन अर्जात नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांना त्यांच्या पात्रतेबाबतच्या गोष्टी लक्षात घेऊन संगणक आधारित चाचणी परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल. प्रत्येक पदासाठी संगणक आधारित चाचणी परीक्षा स्वतंत्रपणे घेतली जाईल. संगणक आधारित चाचणी परीक्षा ९० मिनिटांच्या कालावधीसाठी १०० गुणांची असेल (एका बैठकीत) ज्यामध्ये दोन विभाग (विभाग-अ आणि विभाग-ब) असतील.

Northern Coalfields Limited Recruitment 2024: अर्ज फी

अर्ज शुल्क १००० रुपये, त्यात जीएसटी १८० रुपये म्हणजेच एकूण ११८० रुपये अनारक्षित (UR) /OBC / EWS यांच्यासाठी अर्ज फी आहे. SC/ST/ESM/PwBD/ तसेच या विभागीय उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. अधिक संबंधित तपशीलांसाठी उमेदवारांनी नॉर्दर्न कोलफील्ड्स लिमिटेडची अधिकृत वेबसाइट एकदा पाहून घ्यावी.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Northern coalfields limited recruitment 2024 invited applications for 152 assistant foreman posts asp
Show comments