Northern Railway Recruitment 2023 Registration Underway:उत्तर रेल्वेने सिनिअर टेक्निकल असोसिएट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तुम्हालाही या पदासाठी अर्ज करण्याची इच्छा असेल तर शेवटच्या तारखेपूर्वी निश्चित नमुन्यानुसार अर्ज करा. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ ऑगस्ट २०२३ आहे. भरतीशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या वेबसाइटवरून अर्ज करा

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, तुम्हाला उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल, ज्याचा पत्ता आहे – nr.indianrailways.gov.in. सीनिअर टेक्निकल असोसिएट या पदासाठी या वेबसाईटवरूनच अर्ज करता येईल. सूचना पाहण्यासाठी तुम्ही या वेबसाइटला देखील भेट दिली पाहिजे.

कोण अर्ज करू शकतो


या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने सिव्हिल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग आणि सिग्नल आणि टेलिकॉममध्ये बॅचलर डिग्री असणे आवश्यक आहे. याशिवाय, इतरही पात्रता आहेत ज्या तुम्ही वेबसाइटला भेट देऊन पाहू शकता. अभ्यासाव्यतिरिक्त, उमेदवाराकडे गेट स्कोअर देखील असावा जो २०१९ ते २०२३ दरम्यान लागू केला जाऊ शकतो. या पदांसाठी वयोमर्यादा २० ते ३४ वर्षे आहे. आरक्षित वर्गाला वयात सवलत मिळेल.

रिक्त जागा तपशील

  • एकूण पदे – ९३
  • एसटीए (सिव्हिल): ६०पदे
  • एसटीए(इलेक्ट्रिकल): २० पदे
  • एसटीए (सिग्नल आणि टेलिकॉम): १३ पदे

अधिकृत अधिसुचना – https://nr.indianrailways.gov.in/nr/recruitment/1691829375905_Modified%20STA%20NOTIFICATION%20-%20JULY%202023.pdf

निवड कशी होईल
उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी आणि GATE स्कोअरच्या आधारे निवडले जाईल. अर्जाची फी १०० रुपये आहे. उमेदवाराचा पगार पदानुसार असेल. उदाहरणार्थ, झेड वर्गासाठी ३२ हजार रुपये, वाय वर्गासाठी ३४ हजार रुपये आणि एक्स वर्गासाठी ३७ हजार रुपये पगार असेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Northern railway recruitment 2023 apply for 93 senior technical associate posts at nr indianrailways gov in snk