न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) ने डेप्युटी मॅनेजर आणि कनिष्ठ हिंदी अनुवादकाच्या रिक्त जागा भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया १२ मे रोजी सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २९ मे आहे. उमेदवार http://www.npcilcareers.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतील.
NPCIL भरती २०२३ रिक्त जागा तपशील:
ही मोहिम १२८ रिक्त पदांच्या भरतीसाठी राबविली जात आहे, त्यापैकी डेप्युटी मॅनेजर (HR) पदासाठी ४८ रिक्त पदे, डेप्युटी मॅनेजर (F&A) पदासाठी ३२ रिक्त पदे, डेप्युटी मॅनेजर (C&MM) पदासाठी ४२ रिक्त पदे, डेप्युटी मॅनेजर (कायदेशीर) पदासाठी २ रिक्त पदे आणि कनिष्ठ हिंदी अनुवादक या पदासाठी ४रिक्त जागा आहेत.
NPCIL भरती २०२३ वयोमर्यादा:
उमेदवाराचे वय डेप्युटी मॅनेजर पदासाठी १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. कनिष्ठ हिंदी अनुवादक पदासाठी उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे.
हेही वाचा- Govt Jobs 2023 : FTII मध्ये निघाली भरती, सरकारी नोकरीसाठी इच्छूक उमेदवार करू शकतात अर्ज
तपशीलवार अधिसूचना NPCIL च्या अधिकृत वेबसाइट http://www.npcilcareers.co.in आणि npcil.nic.in वर उपलब्ध असेल.