NPCIL ET Recruitment 2023: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियाएक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदासाठी अर्ज मागवले आहेत. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ३२५ पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार NPCIL च्या अधिकृत संकेतस्थळ npcilcareers.co.in वर जाऊन भरतीसाठी अर्ज करू शकतात. पण, अर्जाची प्रक्रिया ११ एप्रिल २०२३ पासून सुरू होईल. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया २८ एप्रिल २०२३ पर्यंत सुरू राहणार आहे. त्याच वेळी, या पदासाठी शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख देखील २८ एप्रिल आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना अधिकृत अधिसूचना पूर्णपणे तपासण्याची शिफासर केली जाते आणि सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करा.
एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या पदांसाठी वयोमर्यादा
एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा २६ वर्षे असावी. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सवलत दिली जाईल.
हेही वाचा – IRCTC मध्ये १७६ पदांसाठी भरती! थेट मुलाखतीद्वारे मिळवा भारतीय रेल्वेत नोकरी, पाहा अर्ज करण्याची प्रक्रिया
एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता
उपलब्ध माहितीनुसार, एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी संबंधित शाखेतून BE/B.Tech पदवीधर असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवार GATE परिक्षा पास असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रतेशी संबंधित अधिक तपशीलांसाठी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना पहावी.
एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या पदांसाठी या शाखांमध्ये होणार नियुक्त्या
मेकॅनिकल १२३, केमिकल ५०, इलेक्ट्रिकल ५७, इलेक्ट्रॉनिक्स २५, इन्स्ट्रुमेंटेशन २५, सिव्हिल ४५
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी या थेट लिंकवर क्लिक करा – https://www.npcilcareers.co.in/MainSite/DefaultInfo.aspx?info=Oppurtunities
या थेट लिंकवर क्लिक करून अधिकृत सूचना वाचा – https://www.npcilcareers.co.in/ETHQ2023/documents/advt.pdf
एक्झिक्युटिव्ह ट्रेनीच्या पदांसाठी अर्जाचे शुल्क
सामान्य/ EWS/OBC प्रवर्गातील पुरुष उमेदवारांना अर्जाचे शुल्क म्हणून रु. ५०० भरावे लागतील. तर SC, ST, PwBD, महिला अर्जदार आणि NPCIL च्या कर्मचाऱ्यांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.