न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( NPCIL) (भारत सरकारचा उपक्रम), कैगा प्लांट साईट, पोस्ट कैगा, उत्तर कन्नाडा, कर्नाटक – ५८१ ४०० येथे स्टायपेंडिअरी ट्रेनी आणि इतर पदांची भरती. एकूण रिक्त पदे – ३९१.
( I) कॅटेगरी- II – स्टायपेंडिअरी ट्रेनी/टेक्निशियन ( ST/ TN) – २२६ पदे ४ बॅकलॉगमधील पदे. प्रशिक्षण कालावधी – २४ महिने.
(१) ऑपरेटर – ८८ (अजा – १५, अज – ५, इमाव – २५, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३६).
पात्रता – १२ वी (विज्ञान) (फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित विषयांसह) किमान सरासरी ५०ङ्घ गुणांसह उत्तीर्ण. (१० वी स्तरावर एक विषय इंग्रजी असावा.)
(२) इलेक्ट्रिशियन – ३१ पदे (अजा – ५, अज – ३, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३).
(३) फिटर – ५५ पदे (अजा – १०, अज – ४, इमाव – १५, ईडब्ल्यूएस – ५, खुला – २१).
(४) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – १७ पदे (अजा – ३, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ६).
(५) इन्स्ट्रूमेंट मेकॅनिक – २४ पदे (अजा – ४, अज – २, इमाव – ७, ईडब्ल्यूएस – ३, खुला – ८).
(६) मशिनिस्ट – ३ पदे (इमाव – १, खुला – २).
(७) टर्नर – ६ पदे (८) ड्राफ्ट्समन (सिव्हील) १ पद
(९) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) १ पद (खुला).
पद क्र. २ ते ९ साठी पात्रता – १० वी विज्ञान आणि गणित विषयात प्रत्येकी ५० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण (१० वीला इंग्रजी विषय अभ्यासलेला असावा.) आणि संबंधित ट्रेडमधील २ वर्षं कालावधीचा आयटीआय कोर्स सर्टिफिकेट. आयटीआय कोर्स १ वर्ष कालावधीचा असल्यास १ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक.
( II) कॅटेगरी- क स्टायपेंडिअरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट ( ST/ SA) – ८२ पदे. प्रशिक्षण कालावधी – १८ महिने.
(१) इलेक्ट्रॉनिक्स – १३ पदे. (अजा – ३, अज – १, इमाव – २, ईडब्ल्यूएस – २, खुला – ५).
(२) इन्स्ट्रूमेंटेशन – ६ (३) इलेक्ट्रिकल – २४ (अजा – ५, अज – १, इमाव – ५, ईडब्ल्यूएस – २, खुला – ११).
(४) मेकॅनिकल – ३३ (अजा – ७, अज – २, इमाव – ८, ईडब्ल्यूएस – ३, खुला – १३).
पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (आयटीआयनंतर लॅटरल एन्ट्री २ वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमाधारक उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.) (१० वी किंवा १२ वीला इंग्रजी एक विषय अभ्यासलेला असावा.)
( II)( B) ST/ SA (हेल्थ फिजिक्स) – ६ पदे.
(१) ST/ SA (हेल्थ फिजिक्स) ( इ. Sc. Chemistry) – ४ (इमाव – २, खुला – २).
(२) ST/ SA (हेल्थ फिजिक्स) ( B. Sc. Physics) – २ (खुला).
पात्रता – B. Sc. (फिजिक्स मुख्य विषयासह) (केमिस्ट्री/ मॅथेमॅटिक्स/स्टॅटिस्टिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर सायन्स सबसिडिअरी विषयांसह).
किंवा इ. रू. (केमिस्ट्री) ( Physics/ Maths/ Stats/ Elex & Comp. Sc. as subsidiary)
किंवा इ. रू. (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स विषयांसह).
B. Sc. ला किमान ६० टक्के गुण आवश्यक. (१० वी किंवा १२ वीला इंग्रजी एक विषय अभ्यासलेला असावा.) (१२ वीला मॅथेमॅटिक्स विषय अनिवार्य.) ( B. Sc. मॅथेमॅटिक्स मुख्य विषयासह उत्तीर्ण उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.)
( III) असिस्टंट ग्रेड- I ( HR) – २२ (अजा – ५, अज – १, इमाव – ६, ईडब्ल्यूएस – २, खुला – ८).
( IV) असिस्टंट ग्रेड- I ( F & A) – ४ (अज – १, इमाव – १, खुला – २).
( V) असिस्टंट ग्रेड- क ( C & MM) – १० (अजा – १, अज – १, इमाव – ३, ईडब्ल्यूएस – १, खुला – ४).
पात्रता – असिस्टंट ग्रेड- क साठी पदवी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
( VI) नर्स-ए – १ (खुला).
पात्रता – १२ वी आणि जीएनएम डिप्लोमा किंवा इ. रू. (नर्सिंग) किंवा नर्सिंग-ए सर्टिफिकेट आणि ३ वर्षांचा हॉस्पिटलमधील कामाचा अनुभव आणि सेंट्रल/स्टेट नर्सिंग काऊन्सिलकडील रजिस्ट्रेशन किंवा आर्म्ड फोर्सेसमधील नर्सिंग असिस्टंट (किमान क्लास III).
( VII) टेक्निशियन-सी (एक्स-रे टेक्निशियन) – १ (खुला).
पात्रता – १२ वी (विज्ञान) किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि १ वर्षाचा मेडिकल रेडिओग्राफी किंवा एक्स-रे टेक्निक ट्रेड सर्टिफिकेट आणि २ वर्षांचा संबंधित कामाचा अनुभव.
( VIII) सायंटिफिक असिस्टंट-बी – ४५ पदे. (१) कॉम्प्युटर सायन्स – १
(२) सिव्हील – १९ (३) इलेक्ट्रॉनिक्स – २ (४) इन्स्ट्रूमेंटेशन – १ (५) इलेक्ट्रिकल – ७ (६) मेकॅनिकल – १५ पद क्र. १ ते ६ साठी पात्रता – संबंधित विषयातील इंजिनीअरिंग डिप्लोमा किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.
पद क्र. VIII (१) SA/ इ कॉम्प्युटर सायन्स पदासाठी B. Sc. (कॉम्प्युटर सायन्स) किंवा B. Sc. आणि १ वर्षाचा कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा किंवा B. Sc. (स्टॅटिस्टिक्स) आणि १ वर्षाचा कॉम्प्युटर सायन्स डिप्लोमा. ( B. Sc. आणि डिप्लोमाला किमान ६० टक्के गुण आवश्यक.)
वयोमर्यादा – (दि. १ एप्रिल २०२५ रोजी) पद क्र. १ व ९ साठी १८ ते २४ वर्षे; आणि टेक्निशियन-सी पदांसाठी ST/ SA – १८ ते २५ वर्षे. नर्स-ए आणि सायंटिफिक-बी साठी १८-३० वर्षे; असिस्टंट ग्रेड- I – २१ ते २८ वर्षे.
शंकासमाधानासाठी https://www.npcilcareers.co.in वर १ एप्रिल २०२५ (१३.०० वाजे) पर्यंत संपर्क साधा. त्यापूर्वी संकेतस्थळावरील ‘ FAQ’ विभाग नीट वाचावा.
ऑनलाइन अर्ज www.npcilcareers.co.in या संकेतस्थळावर दि. १५ एप्रिल २०२५ (१६.०० वाजे)पर्यंत करावेत. suhaspatil237@gmail.com