NSIC recruitment 2023 : राष्ट्रीय लघु उद्योग महामंडळाने (National Small Industries Corporation Ltd.) उमेदवारंकडून सहाय्यक व्यवस्थापक म्हणजेच असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी अर्ज मागवले आहेत. जे उमेदवार इच्छूक आणि पात्र आहेत ते या पदासाठी अर्ज करू शकतात. त्यासाठी NSICच्या अधिकृत संकेतस्थळाला (nsic.co.in.) भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज जमा करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६ पर्यंत अर्ज करू शकता.
NSIC असिस्टंट मॅनेजरच्या भरती २०२३ : भरतीची तपशीवार माहिती.
या भरती मोहिमेंतर्गत असिस्टंट मॅनेजरच्या ५१ पदांसाठी भरती होणार आहे.
वित्त आणि लेखा (फायनान्स आणि अकांउट्स)- १९ पदे
मानव संसाधन(ह्युमन रिसोर्स) – ०२ पदे
व्यवसाय विकास (बिझनेस डेव्हलपमेंट)-२१ पदे
तंत्रज्ञान (टेक्नलॉजी)– ०५ पदे
कायदा आणि पुनर्प्राप्ती( लॉ आणि रिकव्हरी) – ०२ पदे
कंपनी सचिव (कंपनी सेक्रेटरी) -०१ जागा
राजभाषा -०१ पदे
NSIC असिस्टंट मॅनेजरच्या भरती २०२३ :वेतन
निवड झालेल्या उमेदवाराचे वेतन ३०,०००- १,२०,००० रुपये इतके आहे.
हेही वाचा – RBI मध्ये असिस्टंटच्या ४५० पदांसाठी होणार भरती, ऑक्टोबरमध्ये होईल परिक्षा, असा करा अर्ज
NSIC भरती २०२३: वयोमर्यादा
असिस्टंट मॅनेजरच्यापदासाठी अर्ज करण्याची कमाल वयोमर्यादा २९ सप्टेंबर २०२३ रोजी २८ वर्षे आहे. तथापि, सरकारी नियमनुसार SC, ST, OBC आणि PWBD साठी वयोमर्यादेत शिथिलता लागू आहे.
NSIC असिस्टंट मॅनेजरच्या भरती २०२३ साठी अर्ज करा करू शकता?
१) सर्वप्रथम NSICचे अधिकृत संकेतस्थळ nsic.co.in ला भेट द्या.
२) आता होमपेजवर जाऊन करिअर टॅबवर क्लिक करा
३) आता लिंक फॉर ऑनलाईन अॅप्लिकेशन असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा आणि नवीन पेज उघडले.
४) स्वतःची नोंदणी करा आणि अर्ज करण्यासाठी लॉग इन करा.
५) सर्व माहिती तपशीलवार भरा आणि अर्ज शुल्क जमा करा आणि अर्ज जमा करा. .
६) भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रत डाउनलोड करा.
अर्जाची थेट लिंक – https://nsic.co.in/recruitment/
अधिसुचना – https://www.nsic.co.in/PDFs/Careers/2023830144715.pdf
NSIC असिस्टंट मॅनेजरच्या भरती २०२३ : अर्ज शुल्क
अनारिक्षित श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १५०० रुपये असून NEFTद्वारे भरावे लागेल. एससी, एसटी, पीडब्युडी, महिला उमेदावार आणि विभागातील उमेदावरासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही. उमेदवारांनी हे लक्षात घ्यावे की अर्ज शुल्क परत मिळणार नाही आणि कोणत्याही पर्यायी पेमेंट पद्धती स्वीकारल्या जाणार नाहीत.