NGEL Bharti 2024 : एनटीपीसी म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)अंतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीद्वारे उपकंपनी एनजीईएलमधील इंजिनीयर आणि एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी एकूण ६४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत एनटीपीसीने एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पदांसाठी इच्छुक उमेदवार आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज दाखल करू शकतात.

रिक्त पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता

१) इंजिनीयर (RE- Civil) – २०

  • ६० टक्के गुणांसह BE/B.Tech (Civil) आणि तीन वर्षांचा अनुभव

२) इंजिनीयर (RE- Electrical) – २९

  • ६० टक्के गुणांसह BE/B.Tech (Electrical) आणि तीन वर्षांचा अनुभव

३) इंजिनीयर (RE-Mechanical) – ०९

  • ६० टक्के गुणांसह BE/B.Tech (Mechanical) आणि तीन वर्षांचा अनुभव

४) एक्झिक्युटिव्ह (HR) – ०१

  • पदवीधर + मॅनेजमेंटमध्ये PG पदवी/डिप्लोमा किंवा MSW किंवा MBA आणि तीन वर्षांचा अनुभव

५) इंजिनीयर (CDM) – ०१

  • BE किंवा पदव्युत्तर पदवी (Environment Science / Environment Engineering / Environment Management) आणि पाच वर्षांचा अनुभव

६) एक्झिक्युटिव्ह (Finance) – ०१

  • CA / CMA आणि एक वर्षाचा अनुभव

७) इंजिनीयर (IT) – ०१

  • B.E. / B.Tech (Computer Science/Information Technology) आणि तीन वर्षांचा अनुभव

८) एक्झिक्युटिव्ह (CC)- ०१

  • ६० टक्के गुणांसह PG पदवी / डिप्लोमा Journalism / Advertisement & Public Relations / Mass Communication) आणि तीन वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय १३ एप्रिल २०२४ रोजी ३० वर्षांपर्यंत असणे गरजेचे. त्यात SC आणि ST उमेदवारांना पाच वर्षे; तर ओबीसी उमेदवारांना तीन वर्षांची सूट असेल.

अर्ज शुल्क

General / OBC : ५०० रुपये; SC/ST/PWD/ExSM : शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख

१३ एप्रिल २०२४

अधिकृत वेबसाइट

https://ntpcrel.co.in/

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक

https://jobapply.in/ntpcgreen2024expprofessional/

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ntpc green energy limited ngel recruitment 2024 for 63 engineer executive posts sjr