NTPC Recruitment 2023: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NTPC) भरतीसाठी अधिसुचना जाहीर केली आहे. एनटीपीने ही भरती असिस्टेंट एक्झूक्युटिव्ह ( (ऑपरेशन) आणि असिस्टेंट कमर्शियल एक्झूक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी काढली आहे. या पदांसाठी कंपनीने योग्य उमेदवारांचे अर्ज मागविसे आहे. इच्छूक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन (careers.ntpc.co.in )अर्ज भरू शकतात. एनटीपीसी भरती २०२३ अंतर्गत ही भरती प्रक्रिया ९ मेपासून सुरू झाली आहे.

एनटीपीसी भरती २०२३ : महत्त्वाच्या तारखा

एनटीपीसी भरती २०२३ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू- ०९ मई २०२३ पासून
एनटीपीसी भरती २०२३ साठी ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख – २५ मे २०२३ पर्य

Success Story Of Manu Agrawal In Marathi
Success Story Of Manu Agrawal: एकेकाळी ३५ कंपन्यांनी दिला नकार; पण तरीही जिद्दीने सुरू केला स्वतःचा व्यवसाय; वाचा, मनू अग्रवालचा प्रवास
JKSSB to recruit 669 Sub Inspectors for Jammu and Kashmir Police, notification here employment news
सरकारी नोकरी करण्याची संधी; जम्मू-काश्मीर पोलिसांमध्ये उपनिरीक्षक पदांसाठी…
UPSC Preparation Deontological Moral Theory Career News
UPSCची तयारी: कर्तव्यवादी नैतिक सिद्धांत
Career Mantra MBA Finance Bank Job Career News
करिअर मंत्र
Educational Opportunity Junior Research Fellowship career news
शिक्षणाची संधी: ज्युनियर रिसर्च फेलोशिप
Loksatta career news Central Government TEC Internship
केंद्र सरकारची टीईसी इंटर्नशिप
Success story of IAS Nidhi Gupta famous for her work cleaned drains know her inspiring story
Success Story: ‘या’ IAS अधिकाऱ्याने केली होती नालेसफाई, आता पुन्हा आल्या आहेत चर्चेत, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Success Story Of Sarfaraz In Marathi
Success Story Of Sarfaraz: करोना महामारीचा काळ ठरला गेम चेंजर! फोन खरेदी करण्यासाठी मिळाली सरकारी मदत अन्… वाचा सरफराजची गोष्ट

एनटीपीसी भरती २०२३ : भरती केल्या जाणाऱ्या पदांची संख्या

एनटीपीसी भरती मोहिमेंतर्गत असिस्टेंट एक्झूक्युटिव्ह (ऑपरेशन) आणि असिस्टेंट कमर्शियल एक्झूक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी १२० रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

हेही वाचा – १०वीसह ITIचे प्रमाणपत्र असेल तर BSF मिळू शकते नोकरी, ८१ हजारपर्यंत मिळू शकतो पगार, आजच करा अर्ज

एनटीपीसी भरती २०२३: वयोमर्यादा

एनटीपीसी भरती २०२३ साठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे जास्तीत जास्त वय ३५ वर्ष असले पाहिजे. जास्तीच्या वयोमर्यादेत आरक्षित वर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनिसार सुट मिळेल.

एनटीपीसी भरती २०२३: शैक्षणिक पात्रता

असिस्टेंट एक्झूक्युटिव्ह (ऑपरेशन) पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल इंजिनअरिंगमध्ये पदवी असली पाहिजे. याशिवाय संबिधित क्षेत्रात दोन वर्षांचा अनुभव असला पाहिजे. असिस्टेंट कमर्शियल एक्झूक्युटिव्ह (इलेक्ट्रिकल)पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी असली पाहिजे. या पदासाठी उमेदवार गेट म्हणजेच ग्रॅज्युएट अपटीट्यूड टेस्ट इन इंजिनिअरिंग उतीर्ण असला पाहिजे.

हेही वाचा – भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ‘या’ पदांसाठी होणार भरती, निवड प्रक्रिया आणि अर्जाची पद्धत जाणून घ्या

एनटीपीसी भरती २०२३: अर्जाचे शुल्क

एनटीपीसी भरतीसाठी जनरल, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी वर्गातील उमेदवारांना ३०० रुपये अर्ज शुल्क द्यावे लागेल. तर एससी, एसटी, दिव्यांग आणि एक्स सर्व्हिस मॅन वर्ग उमेदवारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. कोणतेही अर्ज शुल्क न भरता हे या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज शुल्क ऑनलाईन अर्ज प्रक्रियेद्वारे करावे लागेल. उमेदवार क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे या भरतीसाठी अर्ज शुल्क भरू शकतात

एनटीपीसी भरती २०२३: अर्ज कसा भरावा

इच्छूक उमेदवार एनटीपीसीच्या अधिकृत वेबसाईट careers.ntpc.co.in किंवा ntpc.co.in च्या माध्यमातून २३ मे २०२३ पर्यंत अर्ज करू शकतात.