नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन म्हणजेच NTPC ने इंजिनिअर पदाच्या १०० रिक्त जागा भरण्यासाठी भरती अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजेच ३ जानेवारी २०२४ आहे. जे उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत आणि काही कारणास्तव अर्ज करू शकत नाहीत त्यांना फॉर्म भरण्याची शेवटची संधी आहे.
उमेदवार वेळ न घालवता NTPC careers.ntpc.co.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन किंवा या लेखात दिलेल्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरू शकतात. उद्यानंतर अर्जाची विंडो बंद होईल.
NTPC Recruitment 2024: भरती तपशील
या भरतीद्वारे एकूण १०० पदांची नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये इलेक्ट्रिकल इरेक्शन इंजिनिअर (Electrical Erection) ३० पदे, मेकॅनिकल इरेक्शन इंजिनिअर (Mechanical Erection) ३५ पदे आणि सिव्हल कन्स्ट्रक्शन इंजिनिअर (Civil Construction) ३५ पदे आरक्षित आहेत.
हेही वाचा – UPSC-MPSC : पंचवार्षिक योजनेदरम्यान विमान वाहतुकीच्या विकासाकरिता कोणते प्रयत्न करण्यात आले?
NTPC Engineer Recruitment 2024: पात्रता आणि मापदंड
या भरतीमध्ये समाविष्ट होत असलेल्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त युनिवर्सिटी किंवा संस्थेमधून संबधित क्षेत्रात बीई/ बीटेक डिग्री प्राप्त केलेली असली पाहिजे. त्याचबरोबर अर्ज करताना उमेदवाराची उच्चतम वयोमर्यात ३५पेक्षा जास्त नसली पाहिजे.
NTPC Recruitment 2024: : तुम्ही अर्ज कसा करू शकता?
या भरतीमध्ये सामील होण्यासाठी, उमेदवार केवळ ऑनलाइन माध्यमातून अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
हेही वाचा – UPSC-MPSC : भारतातील विमान वाहतुकीच्या विकासाकरिता सरकारद्वारे कोणते प्रयत्न करण्यात आले?
NTPC Recruitment 2024 अधिसूचना – https://careers.ntpc.co.in/recruitment/advertisements/25_2023_eng_adv
NTPC Recruitment 2024 अर्ज भरण्याची थेट लिंक – https://careers.ntpc.co.in/recruitment/login.php
NTPC Recruitment 2024: पगार
या भरतीमध्ये निवडलेल्या उमेदवारांना E2 ग्रेड/IDA नुसार दरमहा रुपये ५०,००० ते १,६०,००० रुपये दिले जातील. भरतीशी संबंधित तपशीलवार माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.