NTPC Recruitment 2025: सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या भरतीतून एकूण ४०० रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीचे परिपत्रक व्यवस्थित वाचावे. एनटीपीसीतील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ मार्च २०२५ आहे.इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल इंजिनियरिंगमध्ये बीटेक असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. १५ फेब्रुवारीपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून ०१ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवार आपले अर्ज NTPC च्या अधिकृत वेबसाइट, careers.ntpc.co.in द्वारे सबमिट करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

NTPC Recruitment 2025 age limit: वयाची अट – एससी/एसटी- ०५ वर्षे सूट, ओबीसी- ०३ वर्षे सूट

NTPC Bharti 2025 selection process: भरती प्रक्रिया – लेखी परीक्षा, कागदपत्र तपासणी, मेडिकल चेक अप

NTPC Recruitment 2025 important dates: महत्त्वाच्या तारखा –
अर्ज करण्यासाठी सुरूवात – १५ फेब्रुवारी २०२५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०१ मार्च २०२५

महत्त्वाची माहिती

पदाचे नाव: सहाय्यक कार्यकारी.

एकूण रिक्त पदे: ४०० पदे.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: १५ फेब्रुवारी २०२५.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ मार्च २०२५.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शैक्षणिक पात्रता: इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये बी.टेक

अधिकृत वेबसाईट – https://www.ntpc.co.in/

अर्ज कसा कराल?

  • एनटीपीसीच्या वेबसाइटवर जा WWW.ntpc.co.in
  • करिअर सेक्शनध्ये EET-2025 भरतीसाठी अर्ज करा.
  • आवश्यक माहिती भरा आणि आवश्यक दस्तऐवज अपलोड करा.
  • अर्ज सादर करा आणि अर्जाची स्लीप डाऊनलोड करा
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ntpc recruitment 2025 apply online vacancy for assistant executive national thermal power corporation limited know more details srk