NPCIL Mumbai Bharti 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी उत्तम संधी आहे. न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरतीसाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार या अधिकृत वेबसाइटद्वारे http://www.npcilcareers.co.in ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया आज १० एप्रिलपासून सुरू झाली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल असेल.
NPCIL Mumbai Bharti 2024 : भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पगार, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, अर्ज कसा करायचा याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊ.
रिक्त पदे आणि पदसंख्या : एक्झिक्युटिव्ह ट्रेनी (Executive Trainees) या पदाच्या एकूण ४०० रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक, इन्स्ट्रुमेंटेशन, सिव्हिल आदी क्षेत्रांतील ही पदे आहेत.
वयोमर्यादा – एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षे यादरम्यान असावे.
शैक्षणिक पात्रता – उमेदवारांनी संबंधित शाखेतून बी.ई./ बी.टेक./ बी.एस्सी. पदवीधर असणे आवश्यक आहे किंवा इन्स्टिट्यूटमधून इंडस्ट्रियल आणि फायर सेफ्टी विषयात किमान ६० टक्के गुण असावेत.
पगार – उमेदवारांना महिन्याला ५५ हजार रुपये पगार मिळेल.
अधिक माहितीसाठी PDF जाहिरात एकदा वाचून घ्यावी.
https://www.npcilcareers.co.in/ETHQ20243004/candidate/Default.aspx
उमेदवार थेट https://www.npcilcareers.co.in/MainSiten/DefaultInfo.aspx या लिंकवरून अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क –
जनरल, ईडब्ल्यूएस व ओबीसी श्रेणीतील फक्त पुरुष अर्जदारांसाठी ५०० रुपये अर्ज शुल्क आहे. तसेच एससी/ एसटी प्रवर्गातील महिला अर्जदार, पीडब्ल्यूबीडी, माजी सैनिक यांना अर्ज शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.