Success story of Nvidia founder Jensen Huang: जिद्द असली की, कोणतंही स्वप्न पूर्ण होतं. कष्ट, अखंड मेहनत व सातत्य यांच्या जोरावर शून्यातून आपण विश्व निर्माण करू शकतो, असं म्हणतात. हेच जेन्सेन हुआंग यांनी सिद्ध करून दाखवलं आहे. एकेकाळी वेटर असणारे जेन्सेन हुआंग आता जगातील सर्वांत मौल्यवान टेक कंपन्यांपैकी एक असलेल्या Nvidia चे CEO बनले आहेत.

जेन्सेन हुआंग (Jensen Huang) एकेकाळी डेनीज (Denney’s) रेस्टॉरंटमध्ये सर्व्हर होते. तैवानमध्ये जन्मलेले आणि काही वर्षे थायलंडमध्ये वाढलेले, जेन्सेन वयाच्या नवव्या वर्षी यूएसला गेले, जिथे त्यांनी तंत्रज्ञानाची आवड जोपासण्यापूर्वी विविध नोकऱ्या केल्या. १९९३ मध्ये जेन्सन यांनी ख्रिस मालाचोस्की (Chris Malachowsky) व कर्टिस प्रीम (Curtis Priem) यांच्यासोबत सॅन जोस येथील डेनीज डिनर येथे एनव्हिडिआ (Nvidia)ची सह-स्थापना केली. त्यांच्या दूरदृष्टीने Nvidia ला ग्राफिक्स प्रोसेसिंग, AI आणि संगणकीय तंत्रज्ञानातील अग्रणी बनवले.

NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
dominican republic citizenship
पैसे नाहीत म्हणून ‘या’ देशानं नागरिकत्वच काढलं विकायला; किंमत लावली १ कोटी ७० लाख!
Ratan Tata Pet Dog came to pay him last tribute
मुक्या प्राण्याची माया! रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव श्वान उपाशी, अंत्यदर्शनाचा भावुक करणारा Video
baba siddique shot dead
“माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा, तो मुंबईला…”; बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपीच्या आईची प्रतिक्रिया!
uddhav thackeray eknath shinde (3)
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का, विधानसभेआधी माजी मंत्र्याचा पक्षप्रवेश
uddhav thackeray
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! मित्रपक्षाने युती तोडली, विधानसभेला स्वबळाचा नारा
Ratan Tata Family Tree
Ratan Tata Family Tree : जमशेदजी टाटा ते नोएल टाटा; जाणून घ्या रतन टाटांची संपूर्ण वंशावळ!

हेही वाचा… वयाच्या ९१व्या वर्षीही रोज जातात ऑफिसला, वाचा ७१ रुग्णालये आणि कोटींची संपत्ती असलेल्या डॉ. प्रताप रेड्डी यांचा प्रेरणादायी प्रवास

अ‍ॅपल आणि मायक्रोसॉफ्ट कंपन्यांना टाकलं मागे

अ‍ॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकत Nvidia चे बाजार भांडवल सुमारे 3.3 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत वाढले आहे. ही आता जगभरातील सर्वांत मौल्यवान सार्वजनिकपणे व्यापार केलेली टेक कंपनी आहे; ज्याचे AI उद्योगात महत्त्वाचे स्थान आहे. Nvidia चे शेअर्स नुकतेच ३.४ टक्क्यांनी वाढले आहेत आणि तो आता वॉल स्ट्रीटचा सर्वांत जास्त ट्रेड केलेला स्टॉक आहे. त्यांची दररोजची उलाढाल ५० अब्ज डॉलर्स इतकी आहे; जी अ‍ॅपल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या मोठ्या स्पर्धकांपेक्षा खूपच अधिक आहे.

जेन्सन यांच्या यशाने त्यांना नवीन आर्थिक उंचीवर नेले आहे. त्यांची निव्वळ संपत्ती (नेटवर्थ) $4 अब्जपेक्षा जास्त वाढली आहे आणि त्यामुळे ते जागतिक स्तरावर ११ व्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांनी मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांसारख्या व्यक्तींनाही मागे टाकले आहे.

हेही वाचा… एका लहानशा गॅरेजपासून केली सुरूवात अन् आता झाले कोटींचे मालक, जाणून घ्या गुरुग्रामच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास

जगातील सर्वांत जास्त पगार मिळविणाऱ्या सीईओंपैकी एक म्हणून ओळखले जाणाऱ्या जेन्सेन यांची वार्षिक कमाई $24.6 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ही कमाई त्यांच्या निर्णायक भूमिकेचे आणि Nvidia च्या नवकल्पना व वाढीसाठी निरंतर समर्पण यांचे प्रतिबिंब आहे. जेन्सन यांनी व्यवस्थापन शैली आणि बदलांवर लक्ष केंद्रित केल्यामुळे Nvidia ला AI क्रांतीत यश प्राप्त झाले आहे. Denny’s च्या सर्व्हरपासून टेक आयकॉन बनण्याचा त्यांचा प्रेरणादायक प्रवास दृढता आणि दृष्टिकोनाची शक्ती दर्शवितो.