Odisha Police Constable Recruitment 2024: ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरती २०२४ जाहीर करण्यात आली आहे, ज्यामध्ये शिपाई/कॉन्स्टेबलसाठी १,३६० रिक्त जागा आहेत. २३ सप्टेंबर २०२४ पासून कॉन्स्टेबल पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १३ ऑक्टोबर २२४ आहे. उमेदवार ओडिशा पोलिसांच्या odishapolice.gov.in अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024: पात्रता निकष

ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरतीसाठी उमेदवारांनी माध्यमिक शिक्षण मंडळ (BSE) Odisha द्वारे घेतलेली त्यांची इयत्ता १० वीची परीक्षा किंवा दुसऱ्या बोर्डाने घेतलेली इतर कोणतीही समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे असावे. १ जानेवारी २०२४ पर्यंत कमाल वयोमर्यादा २३ वर्षे असावी. उच्च वयोमर्यादेत सवलत राखीव श्रेणीतील उमेदवारांना लागू होईल. शिवाय, उमेदवार हा भारताचा नागरिक, आणि निरोगी असावा. तसेच त्याला कोणतीही शारीरिक त्रास नसावा

ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024: निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाईल: संगणक आधारित भरती परीक्षा (CBRE) त्यानंतर शारीरिक मोजमाप आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) आणि शेवटी ड्रायव्हिंग चाचणी आणि वैद्यकीय तपासणी.

ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024: परीक्षा पद्धत

संगणक-आधारित भरती परीक्षेचा कालावधी दोन तासांचा आहे. यात १०० गुणांसाठी १०० प्रश्न असतील. प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असतील आणि त्यांना अनेक पर्याय असतील. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ असे निगेटिव्ह मार्किंग असते. प्रयत्न न केलेल्या प्रश्नांसाठी कोणतेही गुण वजा केले जाणार नाहीत.

हेही वाचा >> सीआरपीएफमध्ये दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी; ११ हजारांहून अधिक पदांसाठी भरती, पगारही तगडा, जाणून घ्या पात्रता

ओडिशा पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024: पगार

ओडिशा पोलीस शिपाई/कॉन्स्टेबलसाठी पगार २१,७० ते ६९,१०० रुपये इतका असेल.