Oil India Limited Recruitment 2024 : ऑइल इंडियामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. या कंपनीमध्ये सीनियर ऑफिसर या पदासाठी एकूण १०२ जागा रिक्त आहेत. इच्छुक उमेदवार oil-india.com या ऑइल इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी अर्ज करण्याची पात्रता आणि अंतिम तारीख काय आहे ते पाहा.
Oil India Limited Recruitment 2024 : भरती
कंपनीमध्ये एकूण १०२ जागा सीनियर ऑफिसर पदासाठी रिक्त असून, त्यांची विभागणी पुढीलप्रमाणे :
ग्रेड ए- १ जागा
ग्रेड बी- ९७ जागा
ग्रेड सी- ४ जागा
एकूण- १०२ जागा
हेही वाचा : बारावीनंतर काय करायचं ठरत नाही? पर्यटनाची आवड असल्यास Tourism क्षेत्रातील नोकरीचे पर्याय पाहा
Oil India Limited Recruitment 2024 : पात्रता
इच्छुक उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेल्या नोटिफिकेशनमधील शिक्षणाची पात्रता तपासून पाहू शकतात.
त्या निकषांमध्ये जर उमेदवार बसत असेल, तरच तो अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
Oil India Limited Recruitment 2024 – अधिसूचना –
https://oilexecutive.cbtexamportal.in/assests/pdf/ADVERT.NO.EXRECT-2024-02(15%20positions-102-vacancies)doc-final.pdf
Oil India Limited Recruitment 2024 : निवड प्रक्रिया
जे उमेदवार सीनियर ऑफिसर पदासाठी पात्र असतील, त्यांना मुलाखत आणि कॉम्प्युटर आधारित परीक्षेसाठी [CBT] बोलावण्यात येईल.
पहिल्या टप्प्यात १०० मार्कांची परीक्षा असेल.
दुसऱ्या टप्प्यामध्ये उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
स्क्रीनिंग आणि निवड प्रक्रिया ही उमेदवाराने दिलेल्या माहितीवर आधारित होणार असल्याने, उमेदवाराने योग्य आणि खरी माहिती देणे आवश्यक आहे.
Oil India Limited Recruitment 2024 : शुल्क
जनरल / ओबीसी [NCL] श्रेणीतील व्यक्तींना ५०० रुपये + कर, असे शुल्क भरावे लागेल.
एससी / एसटी / पीडब्ल्यूबीडी / ईडब्ल्यूएस / एक्स-सर्व्हिसमेन या श्रेणींतील व्यक्तींना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळविता येणार नाही. म्हणजे हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे याची नोंद उमेदवाराने घ्यावी.
या संदर्भातील अजून माहिती वर दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये मिळू शकेल.