Oil India Limited : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारासाठी ऑइल इंडिया लिमिटेडमध्ये संधी उपलब्ध झाली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावीत. ऑयल इंडिया लिमिटेडकडून ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी राबवली जातंय. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. मात्र कोणत्याही परीक्षेशिवाय ही सरकारी नोकरी तुम्ही मिळवू शकता. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

या भरतीसाठी अर्जप्रक्रिया सुरु करण्यात आली असून उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागणार आहे.

रिक्त जागा –

ऑइल इंडियामध्ये इलेक्ट्रिशियन, मॅकेनिक (एसी आणि आर), असोसिएट इंजिनियर (इलेक्ट्रिकल) या पदांसाठी ४० जागा रिक्त आहेत. इलेक्ट्रिशियन पदासाठी १८ जागा रिक्त आहेत. मेकॅनिकसाठी २ जागा रिक्त आहेत. असोसिएट इंजिनियर पदासासाठी २० रिक्त जागा आहेत.

शेवटची तारीख –

२१ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

वयोगट

या नोकरीसाठी २० ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या पदांसाठी उमेदवारांची निवड ही वॉक इन प्रॅक्टिकल/स्किल टेस्टद्वारे केली जाणार आहे. तसेच उमेदवारांचे वैयक्तिक मूल्यांकन देखील केले जाणार आहे.

हेही वाचा >> स्टेट बँकेत मेगा भरती! दरमहा ९३ हजारांपर्यंत पगार; आता ‘ही’ आहे अर्जाची शेवटची तारीख

एकदा भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत पुन्हा मिळविता येणार नाही. म्हणजे हे शुल्क नॉन रिफंडेबल आहे याची नोंद उमेदवाराने घ्यावी.या संदर्भातील अजून माहिती वर दिलेल्या नोटिफिकेशनमध्ये मिळू शकेल.