ONGC Bharti 2024 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ मर्यादित म्हणजेच Oil and Natural Gas Corporation Limited) (ONGC Limited) अंतर्गत मोठी मेगाभरती सुरू आहे. “अप्रेंटिस” पदांच्या एकूण २२३६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तु्म्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करू शकता. विशेष म्हणजे दहावी पास विद्यार्थी सुद्धा या पदासाठी अर्ज करू शकतात. आज आपण या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, पगार याविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (ONGC Bharti 2024 2236 vacancies for Apprentice post 10 th pass student can apply check salary and how to fill application form)

पदाचे नाव – ONGC Limited अंतर्गत अप्रेंटिस पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे.

EPFO Recruitment 2024
EPFO Recruitment 2024: लेखी परीक्षेची न देता मिळवा EPFOमध्ये नोकरीची संधी! महिना ६५,००० रुपये मिळेल पगार
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
mpsc 1333 post exam
नोकरीची संधी: लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेद्वारे भरती
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Job Opportunity Maharashtra State Cooperative Bank Recruitment career news
नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत भरती
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
maharastra vidhan sabha election 2024 shivsena ubt workers upset over muslim candidate
उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळे शिवसैनिक नाराज
NFL Recruitment 2024 National Fertilizers Limited Recruitment 2024
NFL Recruitment 2024: नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी नो टेन्शन; ‘नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड’मध्ये ३४९ जागांसाठी भरती

पदसंख्या – अप्रेंटिस पदासाठी एकुण २२३६ रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .

बीए/बी.कॉम/बीएससी/बीबीए/बीई/बीटेक
१० वी/१२ वी
आयटीआय ट्रेड

हेही वाचा : Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 : अंगणवाडी मुख्यसेविकेच्या १०२ रिक्त पदांसाठीभरती प्रक्रिया सुरू; आजच करा अर्ज, एवढा मिळणार पगार

वयोमर्यादा – या पदासाठी १८ ते २४ वर्ष वयोगटातील विद्यार्थी अर्ज करू शकतात.

अर्ज पद्धती – तुम्ही अप्रेंटिस या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०२४ आहे. त्यामुळे त्वरीत अर्ज करा.

अधिकृत वेबसाईट – या भरती प्रक्रियेविषयी जाणून घेण्यासाठी खालील अधिकृत वेबसाइटवर क्लिक करा. https://ongcindia.com/

अधिसुचना – अर्ज भरण्यापूर्वी खालील अधिसुचना नीट वाचावी.

https://ongcindia.com/web/eng/apprenticeship-opportunities

हेही वाचा : MPSC Town Planner Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे टाऊन प्लॅनरच्या २०८ पदांसाठी होणार भरती, मिळू शकतो १ लाखांपेक्षा जास्त पगार

पगार –

अप्रेंटिस पदासाठी शैक्षणिक पात्रतेनुसार ९,०००, ८०५०. ७०००,७७००, ८०५० रुपये दिले जाईल.

अर्ज कसा भरावा? (how to fill application form)

  • या भरतीप्रकियेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा.
  • शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज भरावा अन्यथा अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसुचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्जात मागितलेली माहिती नीट भरावी.

ओएनजीसी ही देशातील सर्वात मोठी सरकारी मालकीची कंपनी आहे. ही कंपनी तेल व वायू एक्सप्लोरर आणि उत्पादन करते. अनेक विद्यार्थ्यांची या कंपनीत काम करण्याची इच्छा असते. ते या भरतीद्वारे त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकतात.