ONGC Apprentice Recruitment 2024 : परीक्षेशिवाय सरकारी नोकरी पाहिजे? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे पण हे खरंय तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. ONGC मध्ये २,२३६ पदांसाठी अप्रेंटिसच्या रिक्त जागेसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिकृत नोटिफिकेशन ongcindia.com वर जारी करण्यात आले आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, यासाठी अर्ज कसा भरावा? अर्ज भरण्याची शेवटची तारीख कोणती? याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. (ONGC Apprentice Recruitment 2024: 2236 Vacancies Open for 10th grade to graduates Levels Without Exam)
पदाचे नाव
ओएनजीसीमध्ये लायब्रेरी असिस्टंट, फ्रंट ऑफिस असिस्टंट डॉट्समॅन, इलेक्ट्रीशियन, फिटर, मॅकेनिस्ट, स्टेनोग्राफर, अकाउंट एग्जीक्यूटिव्ह, वेल्डर सह विविध ट्रेड्सच्या उम्मीदवारांना नियुक्त केले जाणार. कोणत्या सेक्टरमध्ये किती जागा रिक्त आहेत.जाणून घेऊ या.
नॉर्थन सेक्टर – १६१
मुंबई सेक्टर – ३१०
वेस्टर्न सेक्टर – ५४७
ईस्टर्न सेक्टर – ५८३
साउथर्न सेक्टर – ३३५
सेंट्रल सेक्टर – २४९
पात्रता
या पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डकडून दहावी/बारावी/आयटीआय/बॅचलर डिग्री/ बीएससी/बीबीए/बीटेक/डिप्लोमा
उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा –
या पदांचा अर्ज भरण्यासाठी उमेदवाराचे वय १८ ते २४ वर्ष असावे.
पगार –
निवड झालेल्या उमेदवाराला शैक्षणिक पात्रतेनुसार ग्रॅजुएट अप्रेंटिसला ९०००/-, तीन वर्षाचा डिप्लोमा करणाऱ्या उमेदवाराला ८०५०/-,१० वी/१२ वी ट्रेंड अप्रेंटिस ला ७०००/- , एक वर्षाचा आयटीआय ट्रेड अप्रेंटिस उमेदवाराला ७७००/- आणि दोन वर्षाचा आयटीआय ट्रेड अप्रेंटिस ला ८०५०/- रुपये स्टायपंड मिळणार आहे.
निवड –
उमेदवाराची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार केली जाणार.
आवेदन शुल्क – या अर्जासाठी कोणतेही आवेदन शुल्क नाही.
अधिसुचना –
या भरती प्रक्रियेविषयी अधिक सविस्तर माहितीसाठी खालील अधिसुचनेवर क्लिक करा
https://ongcindia.com/web/eng/apprenticeship-opportunities
हेही वाचा : Success Story: ‘शेतकऱ्याला कमी समजू नका…’ केळीच्या ५०० हून अधिक जातींची लागवड; महिन्याला कमावतात लाखो रुपये
अधिकृक लिंक –
या भरती प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेण्यासाठी ONGC च्या खालील अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊ शकतात – https://ongcindia.com/
अर्ज करण्याची शेवटची तारीख –
अर्ज भरण्याची प्रक्रिया ५ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली असून २५ ऑक्टोबर अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
अर्ज कसा भरावा?
अर्ज भरण्यापूर्वी अधिसुचना नीट तपासावी.
अर्जात विचारलेली माहिती नीट भरावी.
अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी भरावा.
https://apprenticeshipindia.gov.in आणि NATS (https://nats.education.gov.in) या वेबसाइटवरून अर्ज भरावा.