स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणामध्ये प्रशिक्षक या पदासाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जे या पदासाठी पात्र असतील, ते ३० जानेवारी २०२४ पर्यंत आपला अर्ज करू शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पदासाठी पात्र असलेले उमेदवार अर्जाचा फॉर्म स्पोर्ट्स अथॉरिटीच्या ‘sportsauthorityofindia.gov.in’ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन केवळ ऑनलाइन पद्धतीनेच भरू शकतात. अर्ज भरण्याआधी या पदासाठी नेमक्या कोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याबद्दल उमेदवाराने काळजीपूर्वक वाचून घ्यावे.

SAI Recruitment 2024 भरतीबद्दल अधिक माहिती पाहा

या प्रक्रियेमध्ये एकूण २१४ रिक्त जागांची भरती होणार आहे. त्यापैकी नऊ जागा या हाय परफॉर्मन्स प्रशिक्षकासाठी, ४५ जागा या सीनियर प्रशिक्षकासाठी, ४३ पद प्रशिक्षकासाठी, तर उरलेल्या ११७ जागा या सहायक प्रशिक्षकासाठी उपलब्ध आहेत.

SAI Recruitment 2024 भरतीसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

१. सर्वप्रथम sportsauthorityofindia.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
२. साईटवरील होम पेजवर दिसणाऱ्या ‘अप्लाय ऑनलाइन जॉब्स’ या पर्यायावर क्लिक करा
३. त्यानंतर न्यू पेजवर उघडलेल्या भारतीसंबंधी दिलेली माहिती पुढील ‘क्लिक हियर टू अप्लाय’ या पर्यायावर क्लिक करा
४. त्यानंतर सर्वप्रथम ‘रजिस्टर अ न्यू युजर’ पर्यायावर क्लिक करून नोंदणी करून घ्यावी. लॉग इन केल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा.
५. संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज सबमिट करून अर्जाची एक प्रिंट काढून स्वतःकडे ठेवा.

SAI Recruitment 2024 अर्ज करण्याची थेट लिंक
sportsauthorityofindia.gov.in

SAI Recruitment 2024 – अधिसूचना –
https://sportsauthorityofindia.nic.in/sai/public/assets/jobs/1705301111_Signed%20Advt..pdf

SAI Recruitment 2024 : वयोमर्यादा

हेही वाचा :पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी! ज्युनिअर इंजिनिअरच्या पदासाठी होणार भरती; जाणून घ्या कसा करू शकता अर्ज

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा किती असावी ते जाणून घ्या
सहायक प्रशिक्षक- ४० वर्षे
प्रशिक्षक- ४३ वर्षे
सीनियर प्रशिक्षक- ४५ वर्षे
हाय परफॉर्मन्स प्रशिक्षक- ६० वर्षे

३० जानेवारी २०२४ नुसार वयोमर्यादा मोजण्यात येईल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opening for sai recruitment 2024 india how and where to apply for sports authority of india dha