सुहास पाटील
सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे अधिसूचना क्र. प.व.प्र./जीडीसीए परीक्षा अधिसूचना /२०२४/१, दि. १ जानेवारी, २०२४. शासकीय सहकार व लेखा पदविका मंडळ (जी.डी.सी. अॅण्ड ए. बोर्ड) पुणे दि. २४, २५ व २६ मे, २०२४ रोजी सहकार व लेखा पदविका ( G. D. C. & A) परीक्षा व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परीक्षा घेणार आहे. पात्रता – पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण किंवा परीक्षार्थी बिगर पदवीधर आणि सहकार खाते, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर सहकारी संस्थांमध्ये कार्यरत असल्यास (१) १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर ३ वर्षे सेवा पूर्ण झाली असली पाहिजे. (२) १० वी उत्तीर्ण झाल्यानंतर ५ वर्षे सेवा पूर्ण झाली असली पाहिजे. (संबंधित संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सक्षम अधिकाऱयांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.) (बिगर पदवीधर परीक्षार्थी अर्ज भरण्याच्या तारखेस सहकारी संस्थेत कायम झाला नसल्यास संस्थेकडून कायम करून घेण्याचे हमीपत्र असणे आवश्यक आहे.)
परीक्षा शुल्क – जी.डी.सी. अॅण्ड ए. परीक्षा फी रु. ८००/-. सी.एच.एम. परीक्षा फी रु. ५००/-.
परीक्षा शुल्क ऑनलाइन अथवा चलना मार्फत भरता येईल. बँकेमध्ये चलनाने फी भरण्याची मुदत २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करण्यात आली आहे. सदर रक्कम ऑनलाइन पद्धतीने अथवा चलनाद्वारे भरता येईल.
परीक्षा केंद्र – मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छ. संभाजी नगर (औरंगाबाद), लातूर, अकोला, अमरावती, नागपूर व चंद्रपूर. या परीक्षेस नव्याने बसू इच्छिणाऱ्या परीक्षार्थींना तसेच पूर्वी परीक्षेस बसलेले परंतु अनुत्तीर्ण झालेले परीक्षार्थींना बसता येईल.
परीक्षेचे वेळापत्रक –
प्रत्येक पेपर १०० गुणांचा असेल.
पदविका आणि प्रमाणपत्र –
1) जी.डी.सी. अॅण्ड ए परीक्षेचे सर्व सहा विषय उत्तीर्ण होणाऱया परीक्षार्थींना ‘सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (सी.एच.एम.)’ सह शासकीय सहकार व लेखा पदविका (जी.डी.सी. अॅण्ड ए.) परीक्षेचे प्रमाणपत्र आणि जी.डी.सी. अॅण्ड ए परीक्षेचे गुणपत्रक देण्यात येईल.
२) सी.एच.एम. परीक्षेचे सर्व तीन विषय उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींना सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (सी.एच.एम.) परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रक देण्यात येईल.
३) जी.डी.सी. अॅण्ड ए. परीक्षेच्या सहा विषयांपैकी पहिले तीन विषय (विषय क्र. १ मॅनेजमेंट ऑफ को-ऑप. हाऊसिंग सोसायटीज, विषय क्र. २ अकाऊंट्स, व विषय क्र. ३ ऑडिटिंग) उत्तीर्ण होणाऱ्या परीक्षार्थींना सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन (सी.एच.एम.) प्रमाणपत्रासह जी.डी.सी. अॅण्ड ए. परीक्षेचे गुणपत्रक देण्यात येईल.
जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे दिलेल्या पेपर-१ आणि/किंवा पेपर-२ ज्या उमेदवारांना उत्तीर्ण करता आले नसेल त्यांना नविन अभ्यासक्रमावर आधारित पेपर-१ – मॅनेजमेंट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग आणि पेपर-४ – हिस्ट्री, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट इन को-ऑपरेशन हे पेपर द्यावे लागतील.
विशिष्ट विषयांसाठी सूट मिळविण्याबाबत –
सन २००१ नंतर जी.डी.सी. अॅण्ड ए. परीक्षेमध्ये अथवा सी.एच.एम. परीक्षेमध्ये कोणत्याही विषयामध्ये किमान ५० गुण प्राप्त झाले असल्यास त्या विषयाकरिता संबंधित परीक्षांमध्ये सूट मागता येईल.
परीक्षेचा अभ्यासक्रम संबंधित जाहिरात https://www.sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज https://gdca.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर (स्वतचा User ID U Password तयार करून) दि. २५ फेब्रुवारी २०२४ पर्यंत करता येतील. GDC & A परीक्षेसाठी अर्ज केल्यास CHM परीक्षेसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
दिनांक विषय क्र. विषय वेळ
शुक्रवार १ सहकारी गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन स. १० ते १
२४ मे, २०२४ (मॅनेजमेंट ऑफ को-ऑप. हाऊसिंग सोसायटीज)
शुक्रवार २ जमाखर्च (अकाऊंट्स) दु. २ ते ५
२४ मे, २०२४
शनिवार ३ लेखापरीक्षण (ऑडिटींग) स. १० ते १
२५ मे, २०२४
शनिवार ४ सहकाराचा इतिहास, तत्त्वे व व्यवस्थापन दु. २ ते ५
२५ मे, २०२४ (हिस्ट्री, प्रिन्सिपल अँड मॅनेजमेंट इन
को-ऑपरेशन)
रविवार ५ सहकारी कायदा व इतर कायदे स. १० ते १
२६ मे, २०२४ (को-ऑपरेटिव्ह लॉज अॅण्ड अदर लॉज)
रविवार ६ सहकारी बँक, संस्था व इतर वित्तीय संस्था दु. २ ते ५
२६ मे, २०२४ (को-ऑपरेटीव्ह बँकींग अँड क्रेडिट सोसायटीज)
सैनिकी सेवापूर्व शिक्षण
संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवक व युवती जास्तीत जास्त संख्येने जावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती संभाजीनगर येथे मुलांसाठी व नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थे (सर्व्हिसेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट ( SPI)) मध्ये जून २०२४ पासून सुरू होणाऱ्या तुकडीसाठी प्रवेश. पात्रता – (अ) अविवाहीत (मुलगा/मुलगी), (ब) महाराष्ट्राचे अधिवासी ( Domicile) तसेच कर्नाटक राज्यातील फक्त बिदर, बेळगावी आणि कारवार जिह्याचे अधिवासी, (क) उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००७ ते १ जानेवारी २०१० दरम्यानचा असावा, (ड) मार्च/एप्रिल/मे २०२४ मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत (इ. १० वी) परीक्षेला बसणारा/बसणारी, (इ) जून २०२४ मध्ये इयत्ता ११ वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी पात्र असावे. (इ. ७ वी, ८ वी, ९ वी आणि १० वी इयत्तेत किमान ६० टक्के गुण आवश्यक.)
शारीरिक पात्रता – सैन्यदलात अधिकारी बनण्यासाठी दिलेल्या सर्व निकषांसाठी पात्र असावे, हे निकष वढरउ तथा संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. काही प्रमुख निकष पुढीलप्रमाणे – उंची किमान १५७ सें.मी., वजन – ४३ कि.ग्रॅ., मुलांसाठी छाती – ७४ ते ७९ सें.मी., रातांधळेपणा किंवा रंगांधळेपणा नसावा. दूरची दृष्टी – चांगला डोळा ६/६, खराब डोळा ६/९.
निवड पद्धती – लेखी परीक्षा आणि मुलाखत – पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा इंग्रजी माध्यमातून दि. २८ एप्रिल २०२४ रोजी विविध केंद्रांवर घेतली जाईल. परीक्षेमध्ये एकाच प्रश्नपत्रिकेत ६०० गुणांचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी ( Multiple choice) (७५ प्रश्न गणिताचे आणि ७५ प्रश्न सामान्य ज्ञान General Ability Test (GAT)) असे एकूण १५० प्रश्न प्रश्न असतील. वेळ ३ तास. प्रत्येक योग्य उत्तराला ४ गुण व चुकीच्या उत्तरास १ गुण वजा केला जाईल. लेखी परीक्षा साधारणत: इयत्ता ८ वी ते १० वीच्या स्टेट बोर्ड व सीबीएसईच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.
जनरल अॅबिलिटी टेस्टमध्ये इंग्लिश, विज्ञान, सोशल सायन्स/सोशल स्टडीज, जनरल नॉलेज, चालू घडामोडी आणि लॉजिक रिझनिंग या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल. यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल. मुलाखतीच्या वेळी कागदपत्र पडताळणी केली जाईल.
इंटरह्यू पुणे आणि/किंवा छत्रपती संभाजीनगर येथे इंग्रजी माध्यमातून घेतले जातील. अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी संस्थेच्या वेबसाईटवर अपलोड केली जाईल.
निवडलेल्या उमेदवारांना ‘ Joining Instructions’ ई-मेलद्वारा पाठविले जातील. निवडलेल्या मुलांना छत्रपती संभाजीनगर येथील ज्युनियर कॉलेजमध्ये ११ वी (विज्ञान) शाखेत तसेच मुलींना नाशिक येथील ज्युनियर कॉलेजमध्ये ११ विज्ञान शाखेत प्रवेश घ्यावा लागेल.
१२ वी पात्रतेवर उमेदवारांना नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी ( NDA) आणि टेक्निकल एन्ट्री १० २ (टेक्निकल) (TES १० २ ( Tech)) कोर्ससाठी सैन्यदलात प्रवेश मिळविता येतो.
NDA परीक्षा UPSC मार्फत मे आणि डिसेंबर महिन्यात जाहीर केली जाते. TES १० २ (Tech) कोर्ससाठी जाहिरात अॅडिशनल डायरेक्टोरेट जनरल रिक्रूटिंग ब्रँच यांचेतर्फे मे आणि नोव्हेंबरमध्ये दिली जाते. तीन उमेदवारांना सर्व सोयींनी सुसज्ज असे अकोमोडेशन पुरविले जाईल. कॅडेट्सना Balanced Nourish Diet दिला जाईल. कॅडेट्सना NDA प्रवेश परीक्षा आणि SSB इंटरह्यूची तयारी करून घेण्यात येईल. तसेच फिजिकल ट्रेनिंग आणि गेम्स शिकविले जातील. कॅडेट्सना मोटिवेशन आणि सशस्त्र दलातील जीवनाची ओळख करून दिली जाईल. कोर्स २ टर्म्समध्ये विभागलेला असेल.
बोर्डिंग चार्जेस – सध्या दरमहा रु. ३,०००/- बोर्डिंग चार्जेस आहेत. प्रत्येक टर्मच्या सुरूवातीला ६ महिन्यांचे बोर्डिंग चार्जेस उमेदवारांना आगाऊ भरावे लागतील.
सिक्युरिटी डिपॉझिट – रु. ३,०००/- (अजा/अजसाठी रु. १,५००/-) उमेदवारांना NDA मध्ये हजर होते वेळी भरावे लागतील. डिफेन्स अॅकॅडमीत कोणत्याही १२ वी किंवा पदवी स्तरावर उमेदवारांची निवड झाल्यास डिपॉझिटचे पैसे त्यांना परत केले जातील.
कॉलेज फी – ११ वी, १२ वीसाठीची कॉलेजची फी पालकांना SPI मार्फत भरावी लागेल. हॉल तिकीट उमेदवारांना दि. १० एप्रिल २०२४ सकाळी १०.०० वाजेनंतर संस्थेच्या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील.
परीक्षा शुल्क – रु. ४५०/-. ऑनलाइन पद्धतीने फक्त डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेटबँकिंग इ. द्वारे भरावे.ऑनलाइन अर्ज मुलांसाठी www.spiaurangabad.com आणि मुलींसाठी www.girlspinashik.com या संकेतस्थळावर दि. २९ फेब्रुवारी २०२४ (१८.०० वाजे)पर्यंत करावेत.