सुहास पाटील

मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरी ( MTPF), अंबरनाथ आर्मर्ड वेहिकल्स निगम लिमिटेड ( AVNL) यांचे युनिट. (भारत सरकारचा उपक्रम, संरक्षण मंत्रालय) ॲप्रेंटिसेस ॲक्ट, १९६१ अंतर्गत नॉन-आयटीआय आणि आयटीआय उमेदवारांची ट्रेड ॲप्रेंटिसेसच्या ५९ व्या बॅचकरिता भरती. एकूण रिक्त पदे – ९०. ट्रेडनुसार रिक्त पदांचा तपशील –

students failed in 5th and 8th standard in maharashtra
राज्यात पाचवी, आठवीचे किती विद्यार्थी अनुत्तीर्ण?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
school students ai education
नवे वर्ष ‘एआय’चे; शिक्षण संस्थांना काय करावे लागणार?
loksatta editorial centre to end no detention policy for students in classes 5 and 8 in schools
अग्रलेख: नापास कोण?
Dhirubhai Ambani International School Fees
‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’ची फी किती? आकडा ऐकून थक्क व्हाल! ऐश्वर्या रायची लेक, शाहरुखचा मुलगा आहे या शाळेचा विद्यार्थी
mpsc students loksatta news
राज्यसेवा २०२४च्या जागावाढीसाठी विद्यार्थ्यांचे सरकारला साकडे, तहसीलदारासह अनेक पदे रिक्त
National Book Trust is expanding across India with offices opening in Pune cities
एनबीटीची वार्षिक उलाढाल प्रथमच ५०० कोटी रुपयांवर, आता देशभरात विस्तारीकरण
rte admissions process
आरटीईमध्ये प्रवेश हवा, मग ही माहिती जाणून घ्या… ‘या’ तारखेपासून प्रक्रिया…

( I) नॉन-आयटीआय – एकूण ४७ पदे. कालावधी – २ वर्षे. स्टायपेंड – पहिले ३ महिने रु. ३,०००/-, नंतरचे ९ महिने रु. ६,०००/-, दुसऱ्या वर्षी रु. ६,६००/- दरमहा.

(१) फिटर – १० पदे

(२) टर्नर – १५ पदे.

(३) मशिनिस्ट – १६ पदे.

(४) MMTM – ६ पदे.

पात्रता : १० वी किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. (गणित आणि विज्ञान विषयात प्रत्येकी ४० टक्के गुण आवश्यक.)

( II) एक्स-आयटीआय – एकूण ४३ पदे. कालावधी – १ वर्ष. स्टायपेंड – रु. ८,०५०/- दरमहा.

हेही वाचा >>> Success Story: नैराश्यामुळे सोडली NDA, परदेशातील नोकरी सोडून दिली UPSC परीक्षा अन् झाले IAS ऑफिसर

(१) फिटर – ९ पदे.

(२) टर्नर – १४ पदे.

(३) मशिनिस्ट – १५ पदे.

(४) इलेक्ट्रिशियन – ३ पदे.

(५) वेल्डर – २ पदे.

पात्रता : १० वी आणि संबंधित ट्रेडमधील आयटीआय कोर्स किमान सरासरी ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वयोमर्यादा – (दि. २६ जुलै २०२४ रोजी) १५ ते २४ वर्षे. (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे; अजा/अज – ५ वर्षे; दिव्यांग – खुला – १० वर्षे, इमाव – १३ वर्षे, अजा/अज – १५ वर्षे; आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना आयटीआय ट्रेनिंगच्या कालावधीइतकी).

निवड पद्धती : नॉन-आयटीआय ट्रेडसाठी १० वीमधील गुणांनुसार आणि एक्स-आयटीआय ट्रेडसाठी १० वी आणि आयटीआयमधील एकत्रित गुणवत्तेनुसार गुणवत्ता यादी बनविली जाईल.

कागदपत्र पडताळणीनंतर वैद्याकीय तपासणी केली जाईल.

Annexure- I मध्ये दिलेल्या विहीत नमुन्यातील अर्जाची प्रिंट काढून पूर्ण भरलेल्या अर्जावर avnl. co. in/ advertisement for 59th batch Trade Apprentice. MTPE वरील अलिकडच्या काळात काढलेला पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटोग्राफ चिकटवून आवश्यक त्या कागदपत्रांसह पुढील पत्त्यावर दि. २६ जुलै २०२४ पर्यंत पोहोचेल असा पाठवावा.

The Chief General Manager, Machine Tool Prototype Factory, A Unit of AVNL, Govt. of India Enterprise, Ambernath, Dist. Thane – 421502.अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे : (१) आधारकार्ड नसल्यास ओळखपत्र, (२) १० वीचे गुणपत्रक, (३) १० वीचे प्रमाणपत्र, (४) आयटीआयचे एकत्रित गुणपत्रक, (५) नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट, (६) जातीचा दाखला, (७) दिव्यांग दाखला इ.

Story img Loader