दि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड ( NIACL) (भारत सरकारचा उपक्रम). ॲप्रेंटिसेस ॲक्ट १९६१ अंतर्गत ॲप्रेंटिसेसची भरती. एकूण रिक्त पदे – ३२५. राज्यनिहाय रिक्त पदांचा तपशील – (कंसात रिजनल ऑफिसचे नाव दिले आहे.)
महाराष्ट्र (मुंबई – I, मुंबई – III, मुंबई – IV, मुंबई – V, नागपूर, पुणे) – एकूण ७५ पदे (अजा – ७, अज – ६, इमाव – २०, ईडब्ल्यूएस – ७, खुला – ३५) (३ पदे दिव्यांग (कॅटेगरी VI, HI, OH साठी प्रत्येकी १ पद) साठी राखीव).
गोवा (मुंबई – II) – एकूण ३ पदे (खुला), गुजरात (अहमदाबाद, सूरत) – २० पदे, आंध्र प्रदेश (हैदराबाद) – १०, कर्नाटक (बेंगळूरु) – १३ पदे, मध्य प्रदेश (भोपाळ) – १२ पदे, तेलंगणा (हैदराबाद) – १० इ.
१२ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान उमेदवारांना दरमहा रु. ९,०००/- स्टायपेंड दिले जाईल.
पात्रता : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) पदवी (कोणतीही शाखा) उत्तीर्ण.
वयोमर्यादा : (दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी) २१ ते ३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे). (विधवा, घटस्फोटीत, कायद्याने विभक्त पुनर्विवाह न केलेल्या महिला – खुला/ ईडब्ल्यूएस – ३५ वर्षे, इमाव – ३८ वर्षे, अजा/अज – ४० वर्षेपर्यंत अर्ज करण्यास पात्र आहेत.)
हेही वाचा >>> Success Story: स्वप्नांपुढे सारे फिके! एका लहान खोलीत राहण्यापासून ते करोडोंची कंपनी उभारण्यापर्यंतचा यशस्वी प्रवास
रजा – प्रशिक्षणार्थींना एका महिन्यासाठी (महिना संपल्यानंतर) १ दिवसाची रजा जमा होईल. एका वेळेस ४ दिवसांची रजा घेऊ शकतील. प्रशिक्षणार्थी गैरहजर राहिल्यास एका महिन्यासाठी मिळालेले स्टायपेंड त्यांना कंपनीस परत करावे लागेल.
अॅप्रेंटिसशिप पूर्ण झाल्यावर प्रशिक्षणार्थींना असेसमेंट टेस्ट द्यावी लागेल. ज्यात थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग कंपोनंट यांचा समावेश असेल. थिअरी असेसमेंट BFSI सेक्टर स्किल काऊन्सिल ऑफ इंडिया ( BFSI SSC) मार्फत केली जाईल. प्रॅक्टिकल असेसमेंट कंपनीकडून केली जाईल. असेसमेंट टेस्टमधील गुणवत्तेनुसार प्रशिक्षणार्थींना अॅप्रेंटिसशिप सर्टिफिकेट BFSI द्वारा दिले जाईल.
निवड पद्धती : ( i) ऑनलाईन लेखी परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह टाईप), (१) जनरल/फिनान्शियल अवेअरनेस, (२) जनरल इंग्लिश, (३) क्वांटिटेटिव्ह अँड रिझनिंग अॅप्टिट्यूड, (४) कॉम्प्युटर नॉलेज. प्रत्येकी २५ प्रश्न/२५ गुणांसाठी, एकूण १०० प्रश्न, १०० गुण, वेळ ६० मिनिटे. ( ii) रिजनल लँग्वेज टेस्ट – ज्या राज्यातील पदांसाठी उमेदवारांनी अर्ज केला आहे, त्या राज्याची स्थानीय भाषा त्यांना अवगत असणे आवश्यक. (वाचता, लिहिता, बोलता येणे आणि समजणे आवश्यक.)
संबंधित भाषा १० वी, १२ वीला अभ्यासली असल्यास पुराव्यासाठी १० वी/१२ वीचे प्रमाणपत्र सादर केल्यास उमेदवारांना स्थानिय भाषेची परीक्षा माफ असेल. इतरांना रिजनल लँग्वेज टेस्ट द्यावी लागेल. लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार रिक्त पदांच्या 3 पट उमेदवार रिजनल लँग्वेज टेस्ट आणि कागदपत्र पडताळणीसाठी निवडले जातील. अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नेमणूकीचे ठिकाण, दिनांक BFSI SSC मार्फत मेलद्वारे कळविण्यात येईल.
अर्जाचे शुल्क : खुला/इमाव – रु. ८००/-, अजा/अज/महिला – रु. ६००/-, दिव्यांग – रु. ४००/-. (याशिवाय लागू असलेल्या GST कर भरावा लागेल.) https://nats.education.gov.in/ या लिंकवर उमेदवारांनी अॅप्रेंटिसशिपकरिता दि. ५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत अर्ज करावेत. यशस्वीरित्या अर्ज केल्यावर BFSI SSC कडून naik.ashwini@bfsissc.com मेलद्वारे अर्जाचे शुल्क भरण्यासाठी लिंक पाठविली जाईल.
© The Indian Express (P) Ltd