सुहास पाटील
यूपीएससी परीक्षांचे कॅलेंडर
२०२४ मध्ये UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांचे कॅलेंडर जाहीर झाले आहे. UPSC मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेचे नाव, जाहिरात प्रसिद्ध होण्याचा दिनांक, परीक्षा सुरू होण्याचा दिनांक, पात्रतेच्या अटी इ. तपशील पुढीलप्रमाणे –
(१३) इंजिनीअरिंग सर्व्हिसेस (प्रीलिमिनरी) एक्झामिनेशन, २०२४
परीक्षा जाहीर झाल्याचा दिनांक ६ सप्टेंबर २०२३. परीक्षेचा दिनांक १८ फेब्रुवारी २०२४.
पात्रता : (i) सिव्हील/ इलेक्ट्रिकल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंगमधील पदवी किंवा पदविका उत्तीर्ण किंवा (ii) इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स/ इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेली कम्युनिकेशन इंजिनीअर्स/ एअरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया/ इन्स्टिट्यूशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड रेडिओ इंजिनिअर्स, लंडन यांचेकडील असोसिएट मेंबरशिप/ ग्रॅज्युएट मेंबरशिप एक्झामिनेशन उत्तीर्ण किंवा (iii) वायरलेस कम्युनिकेशन इलेक्ट्रॉनिक्स/ रेडिओ फिजिक्स/ रेडिओ इंजिनीअरिंग/ फिजिक्स या विषयातील एम.एस्सी.
वयोमर्यादा : २१ ते ३० वर्षे. निवड पद्धती – स्टेज-१ प्रीलिमिनरी एक्झामिनेशन ऑब्जेक्टिव्ह टाईप दोन पेपर्स कॅटेगरीनुसार.
पेपर-१ जनरल स्टडीज अॅण्ड इंजिनीअरिंग अॅप्टिट्यूड – २०० गुण, वेळ २ तास.
पेपर-२ संबंधित इंजिनीअरिंग कॅटेगरीवर आधारित ३०० गुण, वेळ ३ तास.
(१४) इंजिनीअरिंग सर्व्हिसेस मेन एक्झामिनेशन, २०२४
परीक्षेचा दिनांक २३ जून २०२४.
निवड पद्धती : स्टेज-२ संबंधित विषयावर आधारित २ पेपर्स प्रत्येकी ३०० गुणांसाठी, वेळ ३ तास. (एकूण ६०० गुण वर्णनात्मक स्वरूपाचे प्रश्न) स्टेज-३ पर्सोनॅलिटी टेस्ट – २०० गुण.
अंतिम निवडीसाठी प्रीलिम/स्टेज-१, मेन्स/स्टेज-२ आणि इंटरह्यू/स्टेज-३ मधील गुण एकत्रित केले जातील.
(१५) कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस एक्झामिनेशन, २०२४
परीक्षा जाहीर होण्याचा दिनांक १० एप्रिल २०२४. परीक्षेचा दिनांक १४ जुलै २०२४.
पात्रता : एम.बी.बी.एस. परीक्षा उत्तीर्ण. वयोमर्यादा – ३२ वर्षेपर्यंत.
निवड पद्धती : पार्ट-१ कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन – ५०० गुण (ऑब्जेक्टिव्ह टाईप) (मेडिकल विषयांवर आधारित २ पेपर्स प्रत्येकी २५० गुणांसाठी वेळ प्रत्येकी २ तास)
पार्ट-२ पर्सोनॅलिटी टेस्ट १०० गुण.
या सर्व परीक्षांसाठी पात्र होण्याकरिता पात्रता परीक्षेत गुणांची अट नसते. सर्व परीक्षांमधील ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर्समध्ये चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/३ गुण वजा केले जातात.
CDS आणि NDA & NA परीक्षा वगळता इतर सर्व परीक्षांसाठी वयोमर्यादेत सूट दिली जाते. इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १०/१३/१५ वर्षेपर्यंत.
NDA & NA CS(P) आणि IFS परीक्षा वगळता सर्व परीक्षांसाठी अर्जाचे शुल्क असते रु. २००/-. (NDA & NA CS(P) आणि IFS परीक्षेसाठी रु. १००/-) (अजा/ अज/महिला उमेदवारांना फी माफ असते.)
सर्व परीक्षांसाठीची माहिती www. upsc. gov. in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सर्वसाधारणपणे उमेदवारांचा समज आहे की, केंद्र सरकारच्या कार्यालयात ग्रुप ‘ए’ पदांवर भरती होण्यासाठी सिव्हील सर्व्हिसेस एक्झामिनेशन ही एकच परीक्षा उपलब्ध आहे. UPSC च्या २०२४ सालाकरिता होणाऱ्या परीक्षांची माहितीचे अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येते ते म्हणजे सर्वच परीक्षांमधून आपण केंद्र सरकारमध्ये ग्रुप ‘ए’ अधिकारी बनू शकतो. सिव्हील सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन वगळता तर सर्व परीक्षांचे पेपर्स हिंदी/इंग्रजी भाषांमध्ये असतात. सिव्हील सर्व्हिसेस मेन्स एक्झामिनेशन हिंदी/इंग्रजी शिवाय राज्य घटनेच्या ८ व्या शेड्यूल्डमधील समाविष्ट असलेल्या एका भाषेतसुद्धा देता येते.
केंद्र सरकारमध्ये ग्रुप ‘ए’ पदावर अंदाजे वेतन दरमहा रु. १,१०,०००/- इतर सवलती मिळतात. याशिवाय त्यांना मिळणारा मानमरातब, त्यांच्याकडील सत्ता पाहता शासनाच्या कल्याणकारी आणि इतर योजनांची अंमलबजावणी करण्याचे या अधिकाऱ्यांच्या हातात असते, त्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरामधील घटकांचे कल्याण करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते.
या परीक्षांची तयारी करून उमेदवार केंद्र सरकारच्या विविध कार्यालयांत अधिकारी बनून देशाची सेवा करू शकतात. (समाप्त)
suhassitaram@yahoo.com