MPSC Technical Education Services Recruitment 2023 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग उच्च व तंत्र शिक्षण विभागा अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालक आणि अधिव्याख्याता पदांच्या ३७८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग उच्च व तंत्र शिक्षण विभाग भरती २०२३ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग उच्च व तंत्र शिक्षण विभाग भरती २०२३
पदाचे नाव व रिक्त पदे –
प्राध्यापक – ३२
सहयोगी प्राध्यापक – ४६
सहाय्यक प्राध्यापक/ ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक – २१४
अधिव्याख्याता – ८६
एकूण रिक्त पदे – ३७८
शैक्षणिक पात्रता –
प्राध्यापक : Ph.D + SCI जर्नल्स/ UGC/ AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण १० संशोधन प्रकाशने + १० वर्षे अनुभव.
सहयोगी प्राध्यापक : Ph.D + ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी + SCI जर्नल्स/ UGC/ AICTE मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण ७ संशोधन प्रकाशने + ८ वर्षे अनुभव.
सहाय्यक प्राध्यापक/ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक : ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी/ शारीरिक शिक्षण आणि क्रीडा किंवा शारीरिक शिक्षण किंवा क्रीडा विज्ञान/ लायब्ररी सायन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स किंवा डॉक्युमेंटेशन सायन्स पदव्युत्तर पदवी + NET/ SET.
अधिव्याख्याता : संबंधित विषयात किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी + B.Ed.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात बघा.
मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – ५ वर्षांची सूट.
अर्ज फी –
- खुला प्रवर्ग – ७१९ रुपये.
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ – ३९३ रुपये.
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र.
महत्वाच्या तारखा –
- ऑनलाईन अर्ज करण्याची सुरवात – १९ ऑक्टोबर २०२३
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ नोव्हेंबर २०२३
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – https://mpsconline.gov.in/candidate
अधिकृत वेबसाईट – https://mpsc.gov.in/
भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती पाहण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.
प्राध्यापक – https://drive.google.com/file/d/1HOOHVPFF7BdfvnByPmJJj0EPdG0mDaeK/view
सहयोगी प्राध्यापक – https://drive.google.com/file/d/1nigx5ab-D_t5PSrGpbfuvjuIf0foyC2a/view
सहाय्यक प्राध्यापक/ ग्रंथपाल/ शारीरिक शिक्षण संचालक – https://drive.google.com/file/d/1IhZT0Y4VTaNOCMQEnUVqkHkzvwS-WuBh/view
अधिव्याख्याता – https://drive.google.com/file/d/1esK3A62Pnh3WU2uUPycd9yEeTrdoty7x/view