तामिळनाड मर्कंटाईल बँक लि. (TMB) (एक अग्रगण्य प्रायव्हेट सेक्टर बँक) राज्यनिहाय ‘सिनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह (SCSE)’ पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १७० (खुला गट).

महाराष्ट्र राज्यातील रिक्त पदे – एकूण ३८ (रिजनल लँग्वेज मराठी); गुजरात राज्यातील रिक्त पदे – ३४ (रिजनल लँग्वेज गुजराती); आंध्र प्रदेश – २४ पदे (रिजनल लँग्वेज तेलुगू); कर्नाटक राज्यातील रिक्त पदे – ३२ (रिजनल लँग्वेज कन्नड); तेलंगणा राज्यातील रिक्त पदे – २० (रिजनल लँग्वेज तेलुगू).

education opportunities admission to master of science programs at radiation medicine centre barc
शिक्षणाची संधी : बीएआरसीमध्ये ‘मास्टर ऑफ सायन्स प्रोग्राम’
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Amit Thackeray and Mitali Thackeray
Amit Thackeray : “मला वाटलेलं मिताली…”, निवडणुकीच्या प्रचाराबाबत अमित ठाकरे पत्नीच्या पाठिंब्याविषयी काय म्हणाले?
Raj Thackeray in Borivali
Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Shah Rukh Khan meets fan from Jharkhand who waited for him outside Mannat for 95 days
Shah Rukh Khan : शाहरुख खानने ९५ दिवस ‘मन्नत’बाहेर थांबलेल्या चाहत्याची घेतली भेट, म्हणाला..
article about journey of author subodh kulkarni as a content writer
चौकट मोडताना : ‘कंटेन्ट रायटर’पर्यंतचा मुलाचा प्रवास
Mother saved her daughter from an accident video went viral on social media
हे फक्त आईच करू शकते! चिमुकली रस्त्यावर पळत सुटली अन्…, पुढच्याच क्षणी आईने जे केलं ते पाहून मातृत्वाला कराल सलाम

पात्रता : (दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी) पदव्युत्तर पदवी (कोणत्याही विषयातील) किमान सरासरी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

वय : (दि. ३० सप्टेंबर २०२४ रोजी) २६ वर्षे पूर्ण नसावीत.

अनुभव : असल्यास प्राधान्य देण्यात येईल, परंतु इष्ट पात्रता नव्हे.

वेतन : दरमहा रु. ३२,०००/- इतर भत्ते (वेतनाच्या ५० टक्के) रु. १६,०००/- एकूण रु. ४८,०००/- दरमहा.

याशिवाय वार्षिक देय असलेला वेरिएबल पे रु. १६,०००/- आणि इतर भत्ते.

हेही वाचा >>> MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास

(i) न्यू पेन्शन स्कीम अंतर्गत बँकेचे योगदान (वेतनाच्या १४ टक्के) रु. ४,४८०/-. (ii) मेडिकल इन्श्युरन्स रु. १,७५१.७५. (iii) सेवानिवृत्तीच्या वेळी मिळणारे पैसे (Gratuity) दरमहा रु. १,३३३.३३. (iv) लाईफ इन्श्युरन्स रु. २६०.७५. (v) मेडिकल एड रु. २३५.८३ इ. एकूण सीटीसी रु. ७२,०६१.६७ दरमहा.

निवड पद्धती : लेखी परीक्षेचे स्वरूप IBPS च्या मानका (Standard) प्रमाणे (एकच परीक्षा) परीक्षेचे माध्यम इंग्रजी. लेखी परीक्षेतील गुणांनुसार उमेदवार इंटरव्ह्यूकरिता शॉर्ट लिस्ट केले जातील.

फेज-१ – ऑनलाइन परीक्षा (डिसेंबर २०२४) एकूण १५० प्रश्न, १५० गुण, वेळ १२० मिनिटे.

(i) जनरल अवेअरनेस – २५ प्रश्न, वेळ १५ मिनिटे. (ii) इंग्लिश लँग्वेज – ३० प्रश्न, वेळ २० मिनिटे. (iii) रिझनिंग अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ३० प्रश्न, वेळ २५ मिनिटे. (iv) क्वांटिटेटिव्ह अॅबिलिटी – २५ प्रश्न, वेळ २५ मिनिटे. (v) जनरल बँकिंग – ४० प्रश्न, वेळ ३५ मिनिटे. (एका प्रश्नाला उत्तराचे ५ ऑप्शन्स असतील; प्रत्येकी चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील.)

परीक्षा केंद्र : मुंबई/ ठाणे/ MMR/ नवी मुंबई, पुणे इ.

फेज-२ – पर्सोनल इंटरव्ह्यू (इंग्लिश) – (जानेवारी २०२५) इंटरह्यू कॉल लेटरमधून इंटरव्ह्यूचे केंद्र कळविण्यात येईल.

अर्जाचे शुल्क/ इंटिमेशन चार्जेस : रु. १,०००/- अधिक लागू असलेले टॅक्सेस.

अर्ज कसा करावा : (i) Application Registration, (ii) Payment of Fees, (iii) Document Scan and Upload.

ऑनलाइन अर्ज http://www.tmbnet.in/tmbcareers या संकेतस्थळावर दि. २७ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावेत.

ऑनलाइन अर्जासोबत (i) रंगीत फोटोग्राफ (४.५ सें.मी. x ३.५ सें.मी.) (size 20-50 KB)

(ii) सिग्नेचर (with Blank Ink) (size 10-20 KB)

(iii) Left thumb impression (on white paper black or blue ink) (size 20-50 KB)

(iv) a hand written declaration (on a white paper with blank ink) (size 50-100 KB) इत्यादी स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक. ऑनलाइन अर्ज सबमिट झाल्यानंतर त्यांनी ई-रिसिप्ट आणि ऑनलाइन अर्जाची प्रिंटआऊट घेवून ठेवावी. (ज्यावर फी भरल्याचे डिटेल्स असतील.) अंतिम निवड यादी व तात्पुरते वाटप फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये प्रसिद्ध केले जाईल.