युनियन बँक ऑफ इंडिया ( UBI) (पब्लिक सेक्टर बँक), सेंट्रल ऑफिस, मुंबई ‘लोकल बँक ऑफिसर ( LBO) JMGS- Il पदांची भरती. एकूण रिक्त पदे – १,५००.

पदाचे नाव – ‘लोकल बँक ऑफिसर’ – एकूण १,५०० पदे.

काही राज्यांतील रिक्त पदांचा तपशील – (कंसात स्थानीय भाषा दिली आहे.)

महाराष्ट्र (मराठी) – एकूण ५० पदे

गुजरात (गुजराती) – २००; कर्नाटक (कन्नड) ३००; आंध्र प्रदेश (तेलगू) २००; तेलंगणा (तेलगू) २००.

पात्रता : (दि. १३ नोव्हेंबर २०२४ रोजी) पूर्ण वेळ पदवी (कोणतीही शाखा उत्तीर्ण).

वयोमर्यादा : (दि. १ ऑक्टोबर २०२४ रोजी) २०३० वर्षे (कमाल वयोमर्यादेत सूट – इमाव – ३ वर्षे, अजा/अज – ५ वर्षे, दिव्यांग – १० वर्षे).

प्रोबेशन : निवडलेल्या उमेदवारांना २ वर्षांचा प्रोबेशन कालावधी पूर्ण करावा लागेल.

वेतन श्रेणी : (रु. ४८,४८०-८५,९२०) मूळ वेतन रु. ४८,४८०/- + स्पेशल अलाऊन्स, डिअरनेस अलाऊन्स इतर भत्ते.

निवड पद्धती : निवड पद्धतीमध्ये ऑनलाइन परीक्षा/ ग्रुप डिस्कशन (जर घेतले तर)/ अर्जांची छाननी आणि/ किंवा पर्सनल इंटरव्ह्यू यांचा समावेश असेल. ऑनलाइन परीक्षा/टेस्ट (१) रिझनिंग अँड कॉम्प्युटर अॅप्टिट्यूड – ४५ प्रश्न, ६० गुण, वेळ ६० मिनिटे. (२) जनरल/ इकॉनॉमी/ बँकींग अवेअरनेस – ४० प्रश्न, ४० गुण, वेळ ३५ मिनिटे. (३) डेटा अॅनालिसिस अँड इंटरप्रिटेशन – ३५ प्रश्न, ६० गुण, वेळ ४५ मिनिटे. (४) इंग्लिश लँग्वेज – ३५ प्रश्न, ४० गुण, वेळ ४० मिनिटे. एकूण १५५ प्रश्न आणि २०० गुण, वेळ १८० मिनिटे. चुकीच्या उत्तरांसाठी प्रश्नास असलेल्या गुणांच्या १/४ गुण वजा केले जातील.

इंग्लिश लँग्वेज टेस्ट (वर्णनात्मक) २ प्रश्न (पत्रलेखन आणि निबंध लेखन) २५ गुण, वेळ ३० मिनिटे.

उमेदवारांना प्रत्येक सेक्शनमध्ये किमान पात्रता गुण मिळविणे आवश्यक. तसेच पात्रतेसाठी किमान एकत्रित गुण मिळविणे आवश्यक.

इंटरव्ह्यू घेण्यापूर्वी उमेदवारांचे ऑनलाइन परीक्षेचे गुण जाहीर केले जाणार नाहीत. इंटरव्ह्यूकरिता रिक्त पदांच्या ३ पट उमेदवारांना बोलाविले जाईल. इंटरव्ह्यू १०० गुणांसाठी घेतली जाईल, यातून पात्र होण्यासाठी किमान ४० गुण मिळविणे आवश्यक. (अजा/ अज/ इमाव/ दिव्यांग यांचेसाठी ३५ गुण.) इंटरव्ह्यूच्या वेळी कागदपत्र पडताळणी होईल. ऑनलाइन परीक्षेतील गुणांना ८० वेटेज आणि इंटरव्ह्यूच्या गुणांना २० वेटेज देऊन अंतिम गुणवत्ता यादी बनविली जाईल.

परीक्षा केंद्र : अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी नगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई/ ठाणे/ नवी मुंबई/ MMR, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे व सोलापूर व पणजी इ.

अर्जाचे शुल्क : खुला/ ईडब्ल्यूएस/ इमाव – रु. ८५०/- (जीएसटीसह); अजा/ अज/ दिव्यांग – १७५/- (जीएसटीसह). ऑनलाइन अर्ज www. unionbankofindia. co. in या संकेतस्थळावर दि. १३ नोव्हेंबर २०२४ पर्यंत करावेत.