सुहास पाटील

१) प्रादेशिक सेना (Territorial Army) मध्ये पुरुष/ महिला पदवीधर उमेदवारांची ऑफिसर पदावर भरतीसाठी टेरिटोरियल आर्मी कमिशन ऑनलाइन एन्ट्रन्स एक्झाम २०२३. प्रादेशिक सेना अधिकारी बनून राष्ट्राची सेवा करण्यासाठी लाभप्रद रोजगार (Gainfully Employed) (केंद्र/ राज्य/ सेमी गव्हर्नमेंट/ पीएस्यू/ प्रायव्हेट सेक्टरमधील कर्मचारी तसेच स्वयंरोजगार/ स्वत:चा बिझनेस) असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. (त्यांना जाहिरातीमध्ये दिलेल्या विहीत नमुन्यातील सर्टिफिकेट सादर करावे लागेल.)

Rajendra Gavit, Palghar Assembly Constituency,
राजेंद्र गावित पालघरसाठी आग्रही
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Vadodara Politics Gujarat Floods
Vadodara Politics : भाजपाला वडोदरामध्ये लोकांच्या रोषाचा सामना का करावा लागतोय? जनतेच्या संतापाचं कारण काय?
Gyanradha Multistate, cheated, arrest,
तब्बल ३,५१५ कोटींनी फसवणूक करणाऱ्या ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या प्रमुखांना अखेर ठोकल्या बेड्या
girl molested in nandurbar
Nandurbar Crime : नंदुरबारमध्ये शाळेतील सफाई कर्मचाऱ्याकडून पाचवीतील मुलीचा विनयभंग; अश्लिल व्हिडीओ दाखवून…
Crime News
“कोलकाताच्या घटनेप्रमाणे तुमच्यावरही…”, विद्यार्थींनीना धमकाविणाऱ्या रिक्षाचालकाला अद्दल घडविली
Tata Curvv Ev Waiting Periods Extended From 14 Days To 56 Days After Launch Tata Curvv EV
Tata Curvv EV: ही नवीन इलेक्ट्रिक कार खरेदी करण्यासाठी तुटून पडले ग्राहक; लाँचिंगनंतर वेटिंग पीरियड पोहचला चक्क ५६ दिवसांवर
Hersh Goldberg Polin Hamas hostage
हमासने अपहरण केलेल्या तरुणाचे पालक डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शनच्या मंचावर, सुटकेची केली विनंती; कोण आहे हर्ष गोल्डबर्ग-पॉलिन?

एकूण रिक्त पदे – १९ (पुरुष – १८, महिला – १).

टेरिटोरियल आर्मी हे पूर्ण वेळ करियर नव्हे, या सर्व्हिससाठी पेंशन दिले जात नाही. निवडलेल्या उमेदवारांना लेफ्टनंट रँकवर कमिशन्ड ऑफिसर म्हणून तैनात केले जाते. त्यांना वेतन आणि इतर भत्ते व इतर सोयी-सुविधा रेग्युलर आर्मी ऑफिसरप्रमाणे दिल्या जातील. लेफ्टनंट कर्नल पदांपर्यंतचे प्रमोशन्स ठरलेल्या निकषांनुसार दिले जातील. ब्रिगेडियरपर्यंतचे प्रमोशन्स सिलेक्शन पद्धतीने दिले जातील. टेरिटोरियल आर्मीमधील कमिशण्ड ऑफिसर्सना गरज असल्यास अधिक कालावधीसाठी मिलिटरी सर्व्हिस करिता बोलाविले जाऊ शकतात.

हेही वाचा >>> यूपीएससी सूत्र : न्यूक्लियर ब्रिफकेस, आरआरटीएस रेल्वे अन् गगनयान मोहिमेची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी, वाचा सविस्तर…

पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण. वयोमर्यादा – दि. २१ जुलै २०२३ रोजी १८ ते ४२ वर्षे.

शारीरिक मापदंड – उमेदवार फिजिकली आणि मेडिकली फिट असावा.

वेतन – ७ व्या केंद्रीय वेतन आयोगाप्रमाणे पे-लेव्हल – १०, मूळ वेतन रु. ५६,१००/- अधिक मिलिटरी सर्व्हिसेस पे रु. १५,५००/- अधिक डी.ए. व इतर भत्ते मिळून अंदाजे रु. १,१५,०००/-.

निवड पद्धती – पात्रता परीक्षेतील (पदवी) गुणवत्तेनुसार उमेदवार लेखी परीक्षेसाठी शॉर्ट लिस्ट केले जातील. लेखी परीक्षेतील यशस्वी उमेदवारांची सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड ( SSB) टेस्ट आणि मेडिकल बोर्ड टेस्ट्स घेवून अंतिम निवड ऑनलाइन टेस्ट आणि इंटरह्यूमधील एकत्रित गुणवत्तेनुसार केली जाईल.

लेखी परीक्षा (ऑनलाईन टेस्ट) – लेखी परीक्षा ऑब्जेक्टिव्ह टाईप (कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल.) विभागलेला पेपर एका सत्रात चार पार्टमध्ये घेतला जाईल. २ तास कालावधीची १०० प्रश्न/ १०० गुणांसाठी असेल.

पार्ट-१ रिझनिंग – २५ गुण,

पार्ट-२ प्राथमिक गणित – २५ गुण.

पार्ट-३ जनरल नॉलेज – २५ गुण व

पार्ट-४ – इंग्लिश – २५ गुण.

हेही वाचा >>> UPSC-MPSC : देशातील अर्थव्यवस्थेत उद्योगांची भूमिका काय असते? उद्योगांचे वर्गीकरण कसे केले जाते?

प्राथमिक गणित विषयातील प्रश्नांचा स्तर १० वी पात्रतेचा असेल. इतर विषयांसाठी पदवी स्तरावरील प्रश्न असतील.

चुकीच्या उत्तरासाठी ०.३३ गुण वजा केले जातील.

लेखी परीक्षेतील उत्तीर्ण उमेदवारांना एसएसबी इंटरह्यूकरिता बोलाविले जाईल.

परीक्षा केंद्र – नागपूर, पुणे, बेळगाव, बेंगळूरु, हैदराबाद इ. उमेदवारांनी ३ परीक्षा केंद्रांचा पसंतीक्रम द्यावयाचा आहे.

ट्रेनिंग – ६ महिन्यांचे प्री-कमिशन ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण केल्यास उमेदवारांना टेरिटोरियल आर्मीमध्ये कार्यान्वित ( be commissioned) केले जाईल.

एसएसबीमध्ये स्टेज-१ सायकॉलॉजिक अॅप्टिट्यूड टेस्ट आणि स्टेज-२ इंटेलिजन्स टेस्ट यांचा समावेश असेल. स्टेज-१ मधील उत्तीर्ण उमेदवारांची स्टेज-२ टेस्ट घेतली जाईल. दरवर्षी उमेदवारांना २ महिन्यांचा ट्रेनिंग कँप करावा लागेल. (पहिल्या वर्षीसुद्धा)

अर्जाचे शुल्क – रु. ५००/-.

डिसेंबर २०२३ च्या ३ ऱ्या/४ थ्या आठवड्यात घेतली जाईल. TA Group Headquarters Southern Command, Pune – ४११ ००१ साठी पुणे. (फोन नं. ०२०-२६८८०२३१)

शंकासमाधानासाठी फोन नं. ०११-२१४१११२१ किंवा कामकाजाच्या दिवशी वेळ सकाळी १०.०० ते १७.०० वाजेपर्यंत.

ऑनलाइन अर्ज ( IAF ( TA)-९ ( Revised) Part-१) www. jointerritorialarmy. gov. in या संकेतस्थळावर दि. २१ नोव्हेंबर २०२३ (२३.५५ वाजे) पर्यंत करावेत. (Careers Section & gt; join as an officer & gt; Apply online & gt; registration page & gt; register ( if new user) & gt; upload required documents & gt; payment of fees) अॅडमिट कार्ड उमेदवारांना ऑनलाइन उपलब्ध करून दिले जातील. उमेदवारांना ई-मेल आणि एसएमएस अलर्ट पाठविला जाईल.