Parliament of India Recruitment 2023: सर्वसामान्य भारतीयांच्या मनात ज्या भारतीय संसदेबद्दल नेहमीच कुतूहल आणि त्याबाबत माहिती जाणून घेण्याची इच्छा असते, त्याच संसदेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी चालून आहे. कारण भारतीय संसद भरती शाखा, लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अधिकृत वेबसाइट https://loksabha.nic.in/ वर भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार संसदीय दुभाषी पदासाठी १३ रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार ३ एप्रिल २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. या भरतीसाठीची अन्य आवश्यक माहिती, जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय संसद भरती अधिसूचना ७ मार्च २०२३ रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १३ जागा भरण्यात येणार आहेत. त्यापैकी पदांपैकी ८ इंग्रजी आणि हिंदी दुभाष्यासाठी तर डोंगरी, काश्मिरी, कोकणी, संथाली आणि सिंधी प्रादेशिक भाषा दुभाष्यांसाठी ५ जागा असणार आहेत. उमेदवारांची अंतिम निवड भरती प्रक्रियेच्या विविध टप्प्यांमध्ये पात्र ठरल्यानंतर होईल.

हेही वाचा- SSC Recruitment 2023: दहावी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी; पाच हजारांपेक्षा जास्त जागांसाठी निघाली बंपर भरती

भरतीबाबतच्या महत्त्वाच्या तारखा –

भरतीसाठी ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख ७ मार्च २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ एप्रिल २०२३

पार्लमेंट ऑफ इंडिया भरती २०२३ साठी संसदेच्या अधिकृत वेबसाइटवर पात्र आणि इच्छुक भारतीय नागरिकांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी या https://pvp.nic.in/Interpreter/ लिंकला भेट द्या.

शैक्षणिक पात्रता –

हेही वाचा- इंजिनिअर्सना जॉबची मोठी संधी; भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये ११० जागांसाठी भरती सुरु, इथे करा अर्ज

इंग्रजी/हिंदी दुभाषीसाठी –

मास्टर्स डिग्री अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी पदवी स्तरावर असने आवश्यक.

प्रादेशिक भाषा दुभाषीसाठी

संबंधित प्रादेशिक भाषांसह इंग्रजी किंवा इतर कोणत्याही विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक पात्रतेबाबतच्या अधिकच्या माहितीसाठी भरतीची जाहिरात पाहा

वयोमर्यादा

या पदासाठीची कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे आहे.

उमेदवारांनी अधिकच्या माहितीसाठी संसदेच्या https://loksabha.nic.in/ या अधिकृत बेवसाईट भेट द्यावी.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Parliament of india recruitment 2023 lok sabha secretariat has released the recruitment notification for 13 seats jap
Show comments